शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

6,000mAh बॅटरी, 64MP रियर कॅमेऱ्यासह भारतात आला Samsung Galaxy M32; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: June 21, 2021 1:08 PM

Samsung Galaxy M32 Sale Price: Samsung Galaxy M32 भारतात लाँच झाला आहे, या फोनमध्ये 6,000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे.  

Samsung ने आज गॅलेक्सी ‘एम’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा फोन Samsung Galaxy M32 या नावाने बाजारात दाखल झाला आहे. नावाने मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. या फोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरु होईल आणि हा फोन ऑनलाइन तसेच ऑफलाईन रिटेल स्टोरवर देखील उपलब्ध होईल. (Samsung Galaxy M32 launched in India with 14,999 base price)  

Samsung Galaxy M32 चे स्पेसिफिकेशन्स 

सॅमसंग गॅलेक्सी एम32 स्मार्टफोन 6.4 इंचाच्या फुलएचडी+ इनफिनिटी ‘यू’ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. हा एक 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करणारा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले आहे. हा अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित सॅमसंग वन युआयवर चालतो.  

Samsung Galaxy M32 मध्ये Mediatek Helio G80 चिपसेट देण्यात आला आहे. भारतात हा फोन 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी अश्या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. या फोन्सची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने 1टीबी पर्यंत वाढवता येते. 

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागे एलईडी फ्लॅशसह 64 एमपीचा मुख्य कॅमेरा, 8 एमपीची अल्ट्रावाईड लेन्स, 2 एमपीची मॅक्रो लेन्स आणि 2 एमपीचाच डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20 एमपीचा फ्रंट कॅमेरा मिळतो.  

या ड्युअल सिम फोनमध्ये 4जी एलटीई सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 25W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

Samsung Galaxy M32 ची किंमत 

सॅमसंग गॅलेक्सी एम32 स्मार्टफोनचा 4जीबी रॅम+ 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 14,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. तर 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन Black आणि Light Blue कलरमध्ये अमेझॉन इंडिया, सॅमसंग वेबसाइट आणि रिटेल स्टोर्सवर 28 जूनपासून खरेदीसाठी उपलब्ध होईल.   

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान