6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह धमाकेदार Samsung Galaxy M21 2021 Edition भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: July 21, 2021 02:01 PM2021-07-21T14:01:08+5:302021-07-21T14:02:35+5:30

Samsung Galaxy M21 2021 Edition launch: सॅमसंगने आज भारतात Samsung Galaxy M21 2021 Edition लाँच केला आहे. हा स्मार्टफोन 12,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy M21 2021 Edition launch in india Price 12499 sale Offer  | 6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह धमाकेदार Samsung Galaxy M21 2021 Edition भारतात लाँच 

6000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह धमाकेदार Samsung Galaxy M21 2021 Edition भारतात लाँच 

Next

Samsung ने येत्या 11 ऑगस्ट रोजी ‘Galaxy Unpacked’ इव्हेंटचे आयोजन केले आहे. कंपनी या इव्हेंटमधून दोन फोल्डेबल डिवाइस टेक मंचावर सादर करू शकते. हे फ्लॅगशिप फोल्डेबल स्मार्टफोन जगभरात उपलब्ध होतील. दुसरीकडे कंपनीने आज भारतात एक नवीन लो बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy M21 2021 Edition लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 12,499 रुपयांपासून सुरु होता आहे, हा सॅमसंग फोन 26 जुलैपासून ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडियावर खरेदीसाठी उपलब्ध होईल. (Samsung Galaxy M21 2021 Edition launched with 6,000mAh battery, 48MP triple cameras, and more)

Samsung Galaxy M21 2021 Edition ची किंमत 

4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट- 12,499 रुपये  

6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट - 14,499 रुपये  

Samsung Galaxy M21 2021 Edition येत्या 26 जुलैपासून Arctic Blue आणि Charcoal Black कलर ऑप्शन्ससह अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.  

Samsung Galaxy M21 2021 Edition चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 19.5:9 अस्पेक्ट रेशियो आणि 1080 x 2340 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. या फोनमध्ये सॅमसंगचाच एक्सनॉस 9611 चिपसेट आणि माली जी72 जीपीयू आहे. हा सॅमसंग फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंग वन युआयवर चालतो.  

Samsung Galaxy M21 2021 Edition मध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा मिळत आहे. यात 48-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 5-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 8-मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी या सॅमसंग फोनमध्ये 20-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंगसह 6,000एमएएचची बॅटरी मिळते.  

Web Title: Samsung Galaxy M21 2021 Edition launch in india Price 12499 sale Offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.