शानदार Samsung Galaxy F42 येऊ शकतो 29 सप्टेंबरला भारतात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

By सिद्धेश जाधव | Published: September 20, 2021 06:54 PM2021-09-20T18:54:12+5:302021-09-20T18:57:11+5:30

5G Phone Samsung Galaxy F42 India Price: फ्लिपकार्टने आपल्या फेस्टिव्ह सेलमध्ये सादर होणाऱ्या स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे. यात Samsung चा नवीन फोन 29 सप्टेंबरला लाँच होईल असे सांगण्यात आले आहे.  

Samsung galaxy f42 expected launch in india on 29 september according flipkart  | शानदार Samsung Galaxy F42 येऊ शकतो 29 सप्टेंबरला भारतात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

शानदार Samsung Galaxy F42 येऊ शकतो 29 सप्टेंबरला भारतात; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स 

Next

Samsung भारतात या महिन्याच्या शेवटी एक नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. याची माहिती फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेजच्या मायक्रो साईटवरून समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोन Samsung Galaxy M52 5G असू शकतो. तर काही रिपोर्ट्समधून Samsung Galaxy F42 चे नाव समोर येत आहे कारण कंपनीची F सीरीज फ्लिपकार्टसाठी एक्सक्लुसिव्ह आहे.  

कंपनीच्या या नव्या स्मार्टफोनची लाँच देत Samsung India च्या अधिकृत वेबसाईटवर Samsung Galaxy F42 का पेज लाईव्ह झाल्यानंतर आली आहे. त्यामुळे Galaxy F42 च्या लाँचची शक्यता आणखीन पक्की झाली आहे. हा फोन जागतिक बाजारात सादर झालेल्या Samsung Galaxy Wide5 चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. जो दक्षिण कोरियात 28,000 रुपयांच्या आसपासच्या किंमतीत सादर झाला आहे.  

Samsung Galaxy F42 चे संभाव्य स्पेसीफाकेशन्स  

सॅमसंग Galaxy F42 स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेला हा एक टीएफटी पॅनल आहे. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा डायमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. या लेटेस्ट सॅमसंग फोनमध्ये 6GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. हा 5G फोन अँड्रॉइड 11 ओएससह वनयुआयवर चालतो.   

या सॅमसंग स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy F42 5G मध्ये सिक्योरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देखील देण्यात आले आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Web Title: Samsung galaxy f42 expected launch in india on 29 september according flipkart 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.