कमी किंमतीत 108MP कॅमेरा देण्याची Samsung ची तयारी; Galaxy A73 चे स्पेसीफिकेशन्स आणि किंमत लीक  

By सिद्धेश जाधव | Published: December 3, 2021 03:41 PM2021-12-03T15:41:21+5:302021-12-03T15:42:11+5:30

108MP Camera Phone Samsung Galaxy A73: Samsung Galaxy A73 स्मार्टफोन ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्ट असलेल्या 108MP कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो.

Samsung galaxy a73 smartphone design and specifications leaked  | कमी किंमतीत 108MP कॅमेरा देण्याची Samsung ची तयारी; Galaxy A73 चे स्पेसीफिकेशन्स आणि किंमत लीक  

(सौजन्य: OnLeaks आणि Zoutons)

Next

Samsung स्मार्टफोनचे फक्त स्मार्टफोन नव्हे तर स्मार्टफोनचे कॅमेरा सेन्सर आणि इतर कंपोनंट देखील बनवते. या सेन्सर्सचा वापर अन्य कंपन्या देखील करतात. कंपनीनं 108MP चा एक सेन्सर खूप आधी सादर केला आहे. हा सेन्सर आतापर्यंत सॅमसंगच्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये दिसला आहे. परंतु लवकरच मिड रेंजमध्ये Galaxy A73 स्मार्टफोन ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्ट असलेल्या 108MP कॅमेऱ्यासह लाँच केला जाऊ शकतो. आता या फोनचे रेंडर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत समोर आली आहे.  

Samsung Galaxy A73 चे स्पेसिफिकेशन  

OnLeaks आणि Zoutons नं आगामी Samsung Galaxy A73 स्मार्टफोनचे डिजाइन रेंडर शेयर केले आहेत. त्यानुसार हा फोन एज टू एज डिस्प्ले आणि पंच होल कटआउटसह सादर केला जाईल. ज्यात 6.7-इंचाच अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल.  

या सॅमसंग स्मार्टफोनमध्ये Snapdragon 750G चिपसेट देण्यात येईल. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. हा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सादर केला जाईल. या फोनच्या मागे असलेल्या आयताकृती कॅमेरा मॉड्यूलमध्ये 108MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकते.  

Samsung Galaxy A73 ची संभाव्य किंमत 

Samsung Galaxy A73 ची अधिकृत माहिती कंपनीनं दिली नाही, त्यामुळे या फोनच्या किंमतीचा अंदाज लावणं कठीण आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 108MP चा कॅमेरा सेन्सर असलेला Samsung Galaxy A73 स्मार्टफोन भारतात 32,999 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Web Title: Samsung galaxy a73 smartphone design and specifications leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app