8GB रॅमसह आला Samsung चा दमदार स्मार्टफोन; रेडमी-रियलमीला देणार टक्कर
By सिद्धेश जाधव | Updated: March 25, 2022 18:09 IST2022-03-25T18:09:00+5:302022-03-25T18:09:29+5:30
Samsung Galaxy A23 स्मार्टफोन भारतात 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 8GB RAM सह लाँच झाला आहे.

8GB रॅमसह आला Samsung चा दमदार स्मार्टफोन; रेडमी-रियलमीला देणार टक्कर
Samsung Galaxy A23 स्मार्टफोननं भारतात एंट्री केली आहे. हा फोन 20 हजार रुपयांच्या आत सादर करण्यात आला आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन या बजेटमध्ये रेडमी, रियलमी आणि मोटोरोलाला टक्कर देऊ शकतो. कंपनीनं Samsung Galaxy A23 स्मार्टफोन 5000mAh ची बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम सारख्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह सादर केला आहे.
Samsung Galaxy A23 चे स्पेसिफिकेशन्स
Samsung Galaxy A23 स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा वॉटरड्रॉप नॉच असलेला डिस्प्ले 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा डिवाइस Android 12 वर आधारित OneUI 4.1 वर चालतो. कंपनीनं नाव सांगितलं नाही परंतु या फोनमध्ये ऑक्टकोर प्रोसेसर असेल, एवढीच माहिती दिली आहे. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो.
कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता, Galaxy A23 स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 5MP ची अल्ट्रावाईड लेन्स, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. फ्रंटला 8MP चा सेल्फी शुटर मिळतो. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Samsung Galaxy A23 ची किंमत
Samsung Galaxy A23 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. यातील 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,499 रुपये ठेवली आहे. तर 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 20,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा डिवाइस लाईट ब्लू, ब्लॅक आणि ऑरेंज कलर ऑप्शनमध्ये कंपनीच्या वेबसाईटवरून विकत घेता येईल.