23 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Samsung चा स्मार्टफोन लाँच; पाण्याखाली देखील वापरता येणार हा फोन
By सिद्धेश जाधव | Updated: August 30, 2021 18:49 IST2021-08-30T18:48:37+5:302021-08-30T18:49:03+5:30
Samsung Galaxy A21 Simple: Samsung ने जापानमध्ये Samsung Galaxy A21 Simple स्मार्टफोन सादर केला आहे. जपानमध्ये या स्मार्टफोनची किंमत JPY 22,000 (अंदाजे 14,700 रुपये) ठेवण्यात आली आहे.

23 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Samsung चा स्मार्टफोन लाँच; पाण्याखाली देखील वापरता येणार हा फोन
टेक दिग्गज Samsung ने जापानमध्ये आपला अनोखा स्मार्टफोन सादर केला आहे. या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy A21 Simple ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा एक बजेट सेगमेंटमध्ये सादर करण्यात आलेला स्मार्टफोन आहे. जपानमध्ये या स्मार्टफोनची किंमत JPY 22,000 (अंदाजे 14,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. 9 सप्टेंबर हा फोन तिथे खरेदीसाठी उपल्बध होईल. भारतासह जगभरात हा फोन कधी उपलब्ध होईल हे मात्र कंपनीने सांगितलेले नाही.
Samsung Galaxy A21 Simple चे स्पेसिफिकेशन्स
सॅमसंग गॅलेक्सी ए21 सिंपल मध्ये 5.8 इंचाचा एचडी+ (720×1,560 पिक्सल) TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्ट-कोर एक्सीनॉस 7884B प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरला 3GB रॅम आणि 64GB इनबिल्ट स्टोरेजची जोड देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येईल. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए21 सिंपल मध्ये 13 मेगापिक्सलचा सिंगल कॅमेरा मिळतो. तसेच फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. हा एक वॉटर रेजिस्टंट फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. या फोनमधील 3600mAh ची बॅटरी 560 तासांचा स्टॅन्डबाय टाइम देऊ शकते, असे कंपनीचे म्हणणे आहे.