कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली आहे. सॅमसंगने त्यांचा नवा फोन सॅमसंग ए१७ 5G लॉन्च केला आहे, ज्याची सुरुवाती किंमत २० हजारांपेक्षा कमी आहे. हा फोन गुगलच्या जेमिनी एआय असिस्टंट आणि सर्कल टू सर्च फीचरसह लॉन्च झाला आहे. तसेच हा फोन अँड्रॉइड १५ वर चालतो.
सॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G च्या ६जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंट किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट किंमत २० हजार ४९९ रुपये आहे आणि ८जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २३ हजार ४९९ रुपये इतकी आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि ग्रे अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन सॅमसंग इंडिया ई-स्टोअर, अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतात. एसबीआय आणि एचडीएफसी बँकेच्या क्रेडिटवरून हा फोन खरेदी केल्यास ग्राहकांना १००० रुपयांची सूट मिळत आहे.
सॅमसंग गॅलेक्सी ए१७ 5G हा फोन ड्युअल-सिम सपोर्टसह येतो आणि त्यात ६.७-इंचाचा फुल-एचडी प्लस इन्फिनिटी-यू सुपर एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ आहे.या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर,५ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो.सॅमसंगने गॅलेक्सी ए१७ 5G मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे, जी २५ व्हॉल्ट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
फोनमध्ये ऑक्टा-कोर इन-हाऊस एक्सिनोस १३३० चिपसेट आहे. हा फोन सहा वर्षांसाठी ओएस अपग्रेड आणि सुरक्षा अपडेटसाठी पात्र आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.3, GPS, NFC, OTG आणि USB टाइप-C पोर्ट मिळते. सुरक्षिततेसाठी, त्यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षित करण्यासाठी फोनला आयपी५४ रेटिंग मिळाले आहे.