Phone Under 10000: 10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: January 4, 2022 03:09 PM2022-01-04T15:09:47+5:302022-01-04T15:10:17+5:30

Phone Under 10000: Samsung Galaxy A03 स्मार्टफोन 48MP Camera, 4GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,000mAh Battery असा फीचर्ससह सादर केला गेला आहे.

Samsung Galaxy A03 officially launch know Price Under 10000 rs Specs Sale Offer  | Phone Under 10000: 10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच 

Phone Under 10000: 10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच 

googlenewsNext

Phone Under 10000: Samsung नं आपला एक लो बजेट स्मार्टफोन नोव्हेंबर 2021 मध्ये सादर केला होता. तेव्हा कंपनीनं Samsung Galaxy A03 ची कोणतीही किंमत सांगितली नव्हती. आता हा फोन 48MP Camera, 4GB RAM, Unisoc T606 चिपसेट आणि 5,000mAh Battery असा फीचर्ससह व्हिएतनाममध्ये सादर केला आहे. त्यामुळे Galaxy A03 स्मार्टफोनची किंमत समोर आली आहे.  

Samsung Galaxy A03 ची किंमत 

Samsung Galaxy A03 चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या 3 GB RAM आणि 32 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2,990,000 VND (सुमारे 9,781 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मॉडेलसाठी 3,490,000 VND (सुमारे 11,400 रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.  

Samsung Galaxy A03 चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy A03 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच का HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच डिजाईन असलेला डिस्प्ले आहे. या फोनला ऑक्टा कोर प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. फोनमधील चिपसेटची माहिती मात्र मिळाली नाही. Galaxy A03 चे दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. ज्यात 3GB/32GB आणि 4GB/64GB चा समावेश आहे.   

Samsung Galaxy A03 च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2MP ची डेप्थ ऑफ फील्ड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या सॅमसंगच्या फोनमध्ये 5000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

सावधान! 7 जानेवारीपासून सिमकार्ड ब्लॉक होणार; आजच हे काम करा...

थिएटरचा अनुभव घरच्या घरी; स्वस्तात विकत घ्या 43 इंचाचे हे स्मार्ट टीव्ही, Flipkart देतंय भारी डिस्काउंट

Web Title: Samsung Galaxy A03 officially launch know Price Under 10000 rs Specs Sale Offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.