सॅमसंग Galaxy चे 2 स्मार्टफोन लाँच; A25, A15 वर 3 हजारांपर्यंतचा कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:50 PM2023-12-27T12:50:16+5:302023-12-27T12:51:07+5:30

सॅमसंग कंपनीने Galaxy A25 आणि Galaxy A15 5G हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

Samsung Galaxy 2 Smartphone Launch, A25, A15 Cashback up to 3 thousand | सॅमसंग Galaxy चे 2 स्मार्टफोन लाँच; A25, A15 वर 3 हजारांपर्यंतचा कॅशबॅक

सॅमसंग Galaxy चे 2 स्मार्टफोन लाँच; A25, A15 वर 3 हजारांपर्यंतचा कॅशबॅक

नवीन वर्षाच्या सुरुवातीला नवीन खरेदी करण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो. नवीन वर्षात नवीन वस्तू आपल्या घरी आली पाहिजे, म्हणून नव्याने खरेदी केली जाते. नवीन वर्ष अवघे काही महिन्यांवर येऊन ठपले असताना आता विविध कंपन्यांकडूनही अॅडव्हान्सड प्रोडक्ट बाजारात येत आहेत. विशेष म्हणजे लेटेस्ट फिचर्ससह ह्या वस्तूंवर ग्राहकांना सूटही मिळत आहे. स्मार्टफोन हा सध्या प्रत्येकाच्या जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे, स्मार्टफोन कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा आहे. सॅमसंग कंपनीने A सिरीजमध्ये दोन नवीन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

सॅमसंग कंपनीने Galaxy A25 आणि Galaxy A15 5G हे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन्स Galaxy A23 5G आणि Galaxy A14 5G चे सक्सेसर आहेत. नवीन डिवाइस Super AMOLED डिस्प्लेसह उपलब्ध आहेत. यामध्ये ग्राहकांना ५० मेगा पिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

डिव्हाईस Android 13 वर आधारित One UI 5, सिंगल टेक, ऑब्जेक्ट इरेजर, नॉक्स सिक्योरिटी, प्राइवेट शेयर आणि इतरही दमदार फीचर्ससह हा स्मार्टफोन आहे. 

Samsung Galaxy A25 5G, A15 5G ची किंमत 

सॅमसंगने या दोन्ही स्मार्टफोन्ससाठी ब्लॅक, ब्लू आणि यलो कलरचा लूक लाँच केला आहे. Samsung Galaxy A17 5G च्या बेस व्हेरिएंटची किंमत १९,९९९ रुपये एवढी आहे. तर, Galaxy A25 5G ची किंमत २६,९९९ रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोन्सवर सध्या 3000 रुपयांची अॅडिशनल कॅशबॅक ऑफर असून SBI कार्डवर ग्राहकांना हा लाभ मिळत आहे. कंपनी ने सेलच्या तारखेची घोषणा अद्याप केली नाही. 

Samsung Galaxy A25 5G चे स्पेसिफिकेशन्स

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.5-inch चे Super AMOLED डिस्प्ले दिला असून तो Infinity U डिजाइनचा आहे, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 Nits चे पीक ब्राइटनेससह स्मार्टफोन उपलब्ध आहे. त्यामध्ये, Exynos 1280 प्रोसेसरही आहे. डिव्हाईस 6GB/8GB RAM आणि 128GB स्टोरेज कॉन्फिग्रेशनमध्ये आहे. हा स्मार्टफोन Android 13 पर बेस्ड One UI 5 सह येतो. यामध्ये 50MP + 8MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने फ्रंटमध्ये 13MP का सेल्फी कैमरा दिला आहे. डिव्हाईस पॉवरसाठी 5000mAh ची बॅटरी आणि 25W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. हँडसेट साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरसह उपलब्ध आहे. 

Galaxy A15 5G चे फीचर्स 

या स्मार्टफोनमध्ये 6.5-inch चा Super AMOLED डिस्प्ले आहे, जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह उपलब्ध आहे. यामध्ये MediaTek Dimensity 6100+ प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेजचा ऑप्शन मिळतो. तसेच, 50MP + 5MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपही देण्यात आला आहे. हँडसेट 13MP के फ्रंट कॅमेऱ्यासह उपलब्ध आहे. तर, 5000mAh ची बॅटरी आणि 25W चार्जिंग सपोर्ट आहे. यामध्ये, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि इतर सेक्युरिटी फिचर्सही उपलब्ध आहेत. 
 

Web Title: Samsung Galaxy 2 Smartphone Launch, A25, A15 Cashback up to 3 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.