शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

Facebook, Instagram चालवणे अवघड होणार, अकाऊंटसाठी परवानगी लागणार; सरकारचा प्लॅन काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 16:16 IST

सोशल मीडियावर कोणीही अकाऊंट उघडू शकतो. यासाठी कोणताही नियम नाही. पण, आता सरकारने नवीन नियम लागू केले आहेत.

देशात सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम या प्लॅटफॉर्मवर अनेकांचे अकाऊंट्स आहेत. आता वापरकर्त्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. आता सोशल मीडियासाठी देशात नियम बनवण्यात येणार आहेत. डिजिटल पर्सनल डेटा संरक्षण कायदा ऑगस्ट २०२३ मध्ये संसदेत मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यानुसार आता १८ वर्षाखालील मुलांना सोशल मिडिया वापरणाऱ्यांसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. नवीन डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन नियमानुसार, अल्पवयीन मुलांसाठी सोशल मीडियावर अकाऊंट उघडणे सोपे नाही.

अकाऊंट उघडण्याआधी आई, वडीलांची परवानगी घ्यावी लागणार आहे. आई, वडीलांची परवानगी घेण्यासाठी डिजिटल टोकनचा वापर केला जाणार आहे. 

भाजपच्या माजी आमदाराने घरात पाळल्या मगरी; आयकर पथकाला बसला धक्का...

सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांवर नकारात्मक परिणाम होत आहे. सोशल मीडियावर खाते तयार करण्यासाठी कोणतेही निर्बंध नाहीत. यामुळे कोणत्याही वयोगटातील मूल खाते तयार करू शकतात. १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले सहजपणे अकाऊंट उघडू नाहीत. उलट यासाठी त्यांना अनेक अटी पूर्ण कराव्या लागतात. यासाठी पालकांची परवानगी घेणे आवश्यक असेल, असं या नवीन नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे. 

डिजिटल टोकन दिले जाणार

इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या मते, पडताळणीच्या वेळी आभासी टोकन तयार केले जाईल आणि ते तात्पुरते असेल. डिजिटल डेटा वापरून आभासी टोकन तयार केले जाईल.

या मसुद्यानुसार मुलाने त्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असल्याचे घोषित केल्यावर सोशल मीडियावर अकाऊंट उघडताना पालकांची संमती किंवा पडताळणी आवश्यक असेल. जेव्हा मुलाला खाते तयार करावे लागेल, तेव्हा तो त्याचे वय कमी का घोषित करेल?, अशी मत तज्ञांनी व्यक्त केली आहेत.

यावर अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने १८ फेब्रुवारी पर्यंत जनतेचे मत मागवले आहे. यावर कोणतीही व्यक्ती आपले वैयक्तिक मत मांडू शकते. सर्वांचे मत घेऊन त्यावर विचार केला जाईल. त्यानंतर सरकार नियम लागू करण्याच्या दिशेने वाटचाल करेल.

इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, पडताळणीसाठी डिजिटल टोकनचा वापर केला जाईल. अशी व्यवस्था निर्माण केली जाईल, यामध्ये पालकांना परवानगी देणे किंवा न देण्यास फारसा त्रास सहन करावा लागणार नाही. टोकन जे वापरले जाईल. ते तात्पुरते असेल. म्हणजे गोपनीयतेच्या दृष्टिकोनातून कोणतीही अडचण नाही, असंही ते म्हणाले.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानFacebookफेसबुकInstagramइन्स्टाग्राम