शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 16:42 IST

एका रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, व्हॉट्सअॅपवरुन पाठविलेला मेसेज डिलीट केला असेल, तर तो तसाच डिव्हाईसवर राहतो आणि तो वाचताही येऊ शकतो. 

ठळक मुद्देWhatsApp वर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!स्पॅनिश अँड्रॉईड ब्लॉग अँड्रॉईड जेफेचा दावामेसेज अँड्रॉईडच्या नॉटिफिकेशन सेंटरमध्ये स्टोअर

मुंबई -व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी गेल्या काही दिवसांपूर्वी नवीन फीचर 'डिलिट फॉर एव्हरिवन' आणले. या फिचरच्यामाध्यमातून एखाद्या चॅटमध्ये किंवा ग्रुपवर चुकीने पाठविलेला मेसेज डिलीट करता येते. यामुळे युजर्स खूप खुश झाले. मात्र, एका रिपोर्टनुसार असे समोर आले आहे की, व्हॉट्सअॅपवरुन पाठविलेला मेसेज डिलीट केला असेल, तर तो तसाच डिव्हाईसवर राहतो आणि तो वाचताही येऊ शकतो. स्पॅनिश अँड्रॉईड ब्लॉग अँड्रॉईड जेफेने हा दावा केला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज कित्येक तासांनी पुन्हा वाचले जाऊ शकतात. मेसेज अँड्रॉईडच्या नॉटिफिकेशन सेंटरमध्ये स्टोअर असतात. त्यामुळे तुम्हाला फक्त रेकॉर्ड पाहण्याची गरज आहे, ज्यामुळे तुम्ही मेसेज पुन्हा वाचू शकता, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे, जे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. याच्या माध्यमातून हिस्ट्री सेटिंग्समधून व्हॉट्सअॅप नॉटिफिकेशन रिकव्हर केले जाऊ शकतात, असेही यामध्ये म्हटले आहे.

डिलीट करण्यात आलेले मेसेज कसे वाचता येतील?नोटिफिकेशन हिस्ट्री (Notification History) नावाचे एक अॅप आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागेल. डाऊनलोड केल्यानंतर हे अॅप इंस्टॉल करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन येईल. ज्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन कंटेंटमध्ये वाचता येतील. तुम्हाला पाठवलेला मेसेज डिलीट करण्यात आला असेल तरीही तो वाचला जाऊ शकेल. याशिवाय कोणत्याही अतिरिक्त अॅप ऐवजी नोटिफिशेकचा वापर करु शकतो. तसेच, फोनच्या होमस्क्रीन बटनवर जास्तवेळ प्रेस केल्यानंतर Widgets > Activities > Settings > Notification log येऊ शकते.  मात्र, फोन एकदा रिस्टार्ट केला असेल तर मेसेज वाचता येणार नाहीत. जास्तीत जास्त 100 अक्षरे वाचता येऊ शकतील.

‘डिलिट फॉर एव्हरिवन’ फीचर...व्हॉट्सअॅपच्या ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ या नव्या फीचरची सगळेच आतुरतेने वाट पाहत होते. हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएसमध्ये देण्यात आले आहे. या फीचरमध्ये चुकून पाठवलेले मेसेज काही मिनिटांच्या आत युजर्सना रिकॉल करता येतो. तुम्ही पाठविलेला मेसेज जर डिलिट करायचा असेल तर त्या मेसेजवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तेथे तुम्हाला तीन पर्याय मिळतील. जर तुम्ही पहिला पर्याय निवडला तर तो मेसेज फक्त तुमच्या फोनमधून म्हणजेच तुमच्या पुरता डिलिट होईल. कॅन्सल निवडले तर मेसेज डिलिट होणार नाही. पण जर डिलिट फॉर एव्हरिवन हा पर्याय निवडला तर तो मेसेज तुमच्या तसेच रिसिव्हरच्या चॅट बॉक्समधून डिलिट होईल.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅप