रिलायन्सच्या जिओ युजर्सला मिळालं नवं अपडेट, आता मिळणार 'ही' सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 12:37 PM2019-11-18T12:37:04+5:302019-11-18T12:39:11+5:30

रिलायन्स जिओ ही भारतातल्या दिग्गज टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे.

reliance jio users now can answer landline calls on smartphone know about it | रिलायन्सच्या जिओ युजर्सला मिळालं नवं अपडेट, आता मिळणार 'ही' सुविधा

रिलायन्सच्या जिओ युजर्सला मिळालं नवं अपडेट, आता मिळणार 'ही' सुविधा

googlenewsNext

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ ही भारतातल्या दिग्गज टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. जिओ ग्राहकांना अधिकाधिक फायदा पोहोचवण्यासाठी कंपनी दिवसेंदिवस सुविधा अद्ययावत करत आहे. तसेच जिओ कंपनीमुळे इंटरनेटही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आहे. आता जिओनं स्वतःची लँडलाइन सेवाही अपडेट केली असून, या अपडेट सुविधेमुळे ग्राहकाला लँडलाइन कॉलचं उत्तर फोनच्या माध्यमातून देता येणार आहे.  

खरं तर रिलायन्स जिओनं जियो कॉल (Jio Call App)अ‍ॅप ग्राहकांना उपलब्ध करून दिलं आहे. ज्याच्या माध्यमातून लँडलाइन कॉलचं उत्तर मोबाइलवरून देता येणार आहे. तसेच ग्राहकांना लँडलाइनच्या नंबरवरून व्हिडीओ कॉल करण्याची मुभासुद्धा मिळणार आहे. जिओकॉल अ‍ॅपच्या माध्यमातून लँडलाइन नंबरवरून ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करता येणार आहे. कॉलिंग करण्यासाठी जिओ वापरकर्त्याकडे जिओ सिम किंवा जिओ फायबर कनेक्शनची सुविधा असणं गरजेचं आहे. जिओकॉल अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅप स्टोअरवर उपलब्ध आहे. 
जिओकॉल अ‍ॅपवरून असा करता येतो कॉल 
कॉलिंग करण्यासाठी सर्वात आधी जिओकॉल अ‍ॅपवर जाऊन फिक्स्डलाइन प्रोफाइल ऑप्शनवर क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर दहा अंकी मोबाइल नंबर कॉन्फिगर केला जाणार आहे. आता लँडलाइन नंबरवरून कॉल करण्याबरोबरच कॉलला उत्तरही देता येणार आहे. तसेच आपल्याला जिओ टीव्ही फायबरवरून व्हिडीओ कॉलची सुविधाही मिळणार आहे. 
जिओकॉल अ‍ॅपवरून मिळणार एसएमएस आणि ग्रुप चॅटची सुविधा
जिओ आपल्या ग्राहकांना या अ‍ॅपच्या माध्यमातून आरसीएस (RCS)ची सेवा पुरवणार आहे. यात एसएमएस, रिच कॉल, ग्रुप चॅट, फाइल शेयरिंग आणि स्टिकर्ससारख्या फीचर्सचा समावेश आहे. परंतु त्यासाठी इतर कॉन्टॅक्ट्सजवळही आरसीएस सर्व्हिस पाहिजे. 

Web Title: reliance jio users now can answer landline calls on smartphone know about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jioजिओ