शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Jio युजर्ससाठी New Year Gift; 'या' प्लॅनमध्ये मिळेल 24 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 11:58 IST

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिओने आता आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार  New Year 2024 Gift आणले आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीकडे सर्व प्रकारच्या यजुर्ससाठी स्वस्त आणि महाग असे रिचार्ज प्लॅन आहेत. जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनला अनेक कॅटगरीमध्ये विभागले आहे. मोबाइल युजर्स आपल्या बजेटनुसार प्लॅन निवडू शकतात. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिओने आता आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार  New Year 2024 Gift आणले आहे.

रिलायन्स जिओकडे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असे दोन्ही प्लॅन्स आहेत. लाँग प्लॅन एखाद्या वेळी थोडा महाग वाटू शकतो, परंतु त्यांचे बरेच फायदे आहेत. जिओ आता आपल्या ग्राहकांना नवीन वर्षाची भेट म्हणून 24 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी देत आहे. व्हॅलिडिटीसोबतच कंपनी ग्राहकांना एक्स्ट्रा 75GB डेटा देखील देत आहे. 

389 दिवसांची मिळेल व्हॅलिडिटी ज्या जिओ प्लॅनबद्दल आम्ही सांगत आहोत तो वार्षिक प्लॅन आहे. या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आहे. तुम्हाला हा प्लॅन एकावेळी महाग वाटू शकतो, पण त्याची रोजची किंमत 8 रुपयांपेक्षा कमी आहे. या प्लॅनमध्ये कंपनी युजर्सना 365 दिवसांची व्हॅलिडिटी देते, परंतु नवीन वर्षाच्या ऑफरमध्ये  24 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी मिळते. अशा प्रकारे तुम्ही 389 दिवस नेहमी रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त होऊ शकता.

कंपनी देतेय 900GB पेक्षा जास्त डेटा जिओच्या या वार्षिक प्लॅनमध्ये युजर्सना एकूण 912.5GB डेटा मिळतो, म्हणजेच तुम्ही दररोज 2.5GB डेटा वापरू शकता. ज्यांना अधिक डेटाची गरज आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन चांगला पर्याय आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्लॅनद्वारे डेटाशी संबंधित महत्त्वाची कामे सहजपणे करू शकता.

तुम्ही तुमचा Reliance Jio नंबर किंवा प्लॅन रिचार्ज केल्यास तुम्हाला इतर अनेक फायदे देखील मिळतात. तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर 389 दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग करू शकता. याचबरोबर, या प्लॅनमध्ये तुम्ही दररोज 100 एसएमएसचा लाभ घेऊ शकता. तसेच, जिओकडून या प्लॅनमध्ये आपल्या युजर्सना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर फ्री अॅक्सेस सुद्धा दिला जातो.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानJioजिओMobileमोबाइल