शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Reliance Jio, मीडियाटेकची सर्वात मोठी गेमिंग टुर्नामेंट, लाखो रुपये जिंकण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 11:44 IST

Reliance Jio : मीडियाटेक या कंपनीसोबत रिलायन्स जिओ या स्पर्धेचं आयोजन करत असून याद्वारे गेमर्सना मोठी रक्कम जिंकण्याचीही संधी मिळणार आहे

ठळक मुद्देविजेत्यांना मिळणार लाखो रुपये जिंकण्याची संधीरिलायन्स जिओ आणि मीडियाटेक कंपनीद्वारे गेमर्ससाठी आयोजित केली जाणार स्पर्धा

Biggest Online Gaming: जर तुम्ही गेम्सचे चाहते आहात तर नक्कीच ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण याच गेम्सच्या माध्यमातून तुम्हाला लाखो रूपये जिंकण्याची संधी मिळणार आहे. रिलायन्स जिओ आणि तैवानची कंपनी मीडियाटेकनं ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा ७० दिवस चालणार असून जिओ गेम्सच्या माध्यमातून यात सहभाग घेता येईल. तसंच या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जिओ टिव्ही एचडी स्पोर्ट्स चॅनलवर आणि यूट्यूबवर केलं जाणार आहे. जिओ आणि मीडियाटेकच्या या ईस्पोर्ट्स स्पर्धेचं आयोजन भारतातील ऑनलाइन गेमिंगच्या चाहत्यांसाठी केलं जात आहे. मीडियाटेक सोबत जिओ या स्पर्धेचं आयोजन करत असून याद्वारे गेमर्सना मोठी रक्कम जिंकण्याचीही संधी मिळणार आहे. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकाला १२ लाख ५० हजार रूपये जिंकण्याची संधी मिळेल. काही दिवसांपूर्वीच जिओ गेम्सनं ऑनलाइन गेमिंग प्रोग्राम 'इंडियास गेमिंग चॅम्पिअन' या स्पर्धेचं यशस्वीरित्या आयोजन केलं होतं. कशी असेल ही स्पर्धा?या स्पर्धेत गेमर्सचं स्किल, टीम वर्क, व्हर्च्युअल गेमिंग एरिनामधील त्यांची क्षमता पाहिली जाणार आहे. या स्पर्धेत गेमिंग मास्टर्सद्वारे तयार करण्यात आलेले रॉयल टायटल, फ्री फायरसारखे गेम्स असतील. जिओ गेम्स प्लॅटफॉर्म्सद्वारे हे जिओ आणि नॉन जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त गेमर्सना साडेबारा लाखांची रक्कम जिंकण्याचीही संधी मिळणार आहे. कशी कराल नोंदणी?२९ डिसेंबरपासून या स्पर्धेच्या नोंदणीला सुरूवात झाली आहे. गेमर्सना ९ जानेवारी २०२१ पर्यंत यासाठी नोंदणी करता येईल. १३ जानेवारी २०२१ ला या स्पर्धेची सुरूवात होईल आणि ७ मार्च रोजी या स्पर्धेचा अखेरचा दिवस असेल. सर्वच जिओ आणि नॉन जिओ ग्राहकांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नोंदणीसाठी गेमर्सना https://play.jiogames.com/esports या लिंकवर क्लिक करावं लागेल. तसंच नोंदणीसाठी किंवा सहभागासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. यासंबंधी अधिक माहितीसाठी  https://i.mediatek.com/free-fire-gaming-master-Jioesport या संकेतस्थळावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMukesh Ambaniमुकेश अंबानीJioजिओ