शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Reliance Jio GigaFiber : आजपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात; 500 रुपयांपासून प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 14:57 IST

मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओ आता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे. गिगाफायबरच्या रजिस्ट्रेशनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे.

नवी दिल्ली : मोबाईल इंटरनेट सेवा क्षेत्रातील धमाक्यानंतर रिलायन्सने आता ब्रॉडबँड सेवा क्षेत्रात पाऊल टाकले आहे. रिलायन्स जिओ आता गिगाफायबर (JioGigaFiber) सर्व्हिस देणार आहे. गिगाफायबरच्या रजिस्ट्रेशनसाठी आजपासून सुरुवात झाली आहे. जिओ गिगाफायबर गेल्या महिन्यात लाँच करण्यात आले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, गिगाफायबर सर्व्हिसच्या माध्यमातून ग्राहकाला 1Gbps चा इंटरनेट स्पीड मिळणार आहे. सध्या गिगाफायबर सर्व्हिससाठी ग्राहकाला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.  तसेच, ज्या शहरातून सर्वाधिक जास्त रजिस्ट्रेशन होईल, त्या शहराला पहिल्यांदा गिगाफायबर कनेक्शन देण्यात येणार आहे. देशातल्या 1,100 शहरांपर्यंत जिओ गिगाफायबरचे जाळे पसरवण्याचा कंपनीने दावा केला आहे. याचबरोबर, एका रिपोर्टनुसार,  जिओ गिगाफायबर प्लॅनची सुरुवात 500 रुपयांपासून असण्याची शक्यता आहे. यामध्ये अल्ट्रा हाय स्पीड इंटरनेटसोबत बेस्ड टीव्हीची सुविधा असणार आहे.  दिवाळी सणाच्या मुहूर्तावर रिलायन्स जिओ गिगाफायबर बाजारात येणार आहे. यामध्ये ग्राहकांना 700 रुपयांपासून 1000 रुपयापर्यंत 100 Mbps चा इंटरनेट स्पीड मिळण्याची शक्यता आहे. तसेच, 100GB पर्यंत डेटा मर्यादा असणार आहे. दरम्यान, रिलायन्स जिओ कंपनी या प्लॅनच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी ब्रॉडबॅंड आणि टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देणार असल्याचे बोलले जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जिओ होम ब्रॉडबॅंडची किंमती सध्या 4 जी मोबाइल डेटा रेट पेक्षा 25-30 टक्के स्वस्त होतील.

अशाप्रकारे करा रजिस्ट्रेशन... जिओ गिगाफायबरचे रजिस्ट्रेशन jio.com या संकेतस्थळावर करता येणार आहे. यासाठी कोणतीही किंमत आकारली जाणार नाही. रजिस्ट्रेशन करताना ग्राहकाला आपले संपूर्ण नाव, पत्ता आणि ईमेल याची माहिती द्यावी लागणार आहे. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओtechnologyतंत्रज्ञान