शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

599 रुपयांत Reliance Jio देतंय 100GB डेटा, Netflix व Amazon Prime मोफत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:55 IST

Free Netflix, Amazon Prime : तुम्हाला Amazon Prime Video आणि Netflix सारख्या लोकप्रिय OTT चे मोफत सबस्क्रिप्शन हवे असल्यास एक चांगली संधी आहे.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओकडे (Reliance Jio) प्रीपेड रिचार्ज पॅक कॅटगरीमध्ये अनेक प्लॅन उपलब्ध आहेत. मुकेश अंबानी यांच्या मालकीची कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या किंमती आणि सुविधांसह प्लॅन ऑफर करतात. पोस्टपेड प्लॅन कॅटगरीमध्ये कंपनीचे अनेक प्लॅन देखील आहेत. अलीकडे, जिओने OTT सबस्क्रिप्शनसह येणारे सर्व प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत. परंतु तुम्हाला Amazon Prime Video आणि Netflix सारख्या लोकप्रिय OTT चे मोफत सबस्क्रिप्शन हवे असल्यास एक चांगली संधी आहे. जिओचे असे काही पोस्टपेड प्लॅन आहेत ज्यात हे दोन्ही OTT मोफत सबस्क्रिप्शनसह येतात. दरम्यान, 599 रुपयांच्या जिओ पोस्टपेड प्लॅनबद्दल सर्व काही माहिती जाणून घ्या...

रिलायन्स जिओच्या 599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची ​व्हॅलिडिटी एक बिल सायकल म्हणजेच 28 दिवस आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना एकूण 100 जीबी 4G डेटा दिला जातो. प्लॅनमध्ये मिळणारा एकूण डेटा संपल्यानंतर ग्राहकांना प्रति जीबी 10 रुपये चार्ज द्यावे लागेल. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये 200 जीबी डेटा रोलओव्हरचीही सुविधा आहे. म्हणजेच, जर तुम्ही प्लॅनमध्ये उपलब्ध असलेला 100 जीबी डेटा एका महिन्यात वापरण्यास सक्षम नसाल, तर उर्वरित डेटा पुढील महिन्याच्या कोट्यामध्ये जोडला जाईल.

जिओ ग्राहकांना हा फॅमिली पोस्टपेड प्लॅन घेतल्यावर 1 अतिरिक्त सिम कार्ड देखील दिले जाते. प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलची सुविधा मिळते. म्हणजेच, देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉइस कॉल (लोकल, एसटीडी आणि रोमिंग) करता येतात. रिलायन्स जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये दररोज 100 एसएमएस देखील मिळतात.

रिलायन्स जिओचा हा प्लॅन अशा लोकांना आवडेल, ज्यांना कोणत्याही अतिरिक्त पैशाशिवाय लोकप्रिय OTT सबस्क्रिप्शन प्लॅन हवा आहे. जिओच्या या प्लॅनसह, ग्राहकांना दरमहा 599 रुपये भरून Netflix, Amazon Prime, जिओ टीव्ही, जिओ सिक्युरिटी आणि जिओक्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. तसेच, प्लॅनमध्ये मिळणारे Amazon Prime Video सबस्क्रिप्शन 1 वर्षासाठी व्हॅलिड आहे. विशेष म्हणजे, या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी JioPrime साठी 99 रुपये द्यावे लागतील.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओamazonअ‍ॅमेझॉनNetflixनेटफ्लिक्स