Jio कडून तीन नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच; JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल मोफत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2022 07:49 PM2022-05-28T19:49:58+5:302022-05-28T19:50:28+5:30

reliance jio : तिन्ही प्लॅनमध्ये डेटा मर्यादा वेग-वेगळी असेल. त्याचा सर्वात स्वस्त म्हणजेच बेस प्लॅन 30GB डेटासह येतो. 

reliance jio 4 new postpaid plan offers free jiofi 4g wireless hotspot | Jio कडून तीन नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच; JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल मोफत

Jio कडून तीन नवीन पोस्टपेड प्लॅन लाँच; JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट मिळेल मोफत

Next

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी पुन्हा एकदा गिफ्ट आणले आहे. JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉटच्या खरेदीवर 3 नवीन मासिक पोस्टपेड प्लॅन सादर करण्यात आले आहेत. या प्लॅनची ​​किंमत 249 रुपये, 299 रुपये आणि 349 रुपये आहे. तिन्ही प्लॅनमध्ये डेटा मर्यादा वेग-वेगळी असेल. त्याचा सर्वात स्वस्त म्हणजेच बेस प्लॅन 30GB डेटासह येतो. 

दुसरीकडे,  40GB आणि 50GB डेटा अनुक्रमे 299 आणि 349 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. तिन्ही प्लॅनची वैधता 1 महिना आहे. यासह 18 महिन्यांचा लॉक-इन कालावधी देखील असेल. तसेच, या प्लॅनमध्ये युजर्स कोणत्याही प्रकारचा व्हॉईस किंवा एसएमएसचा लाभ मिळणार नाही. या प्लॅन्स अंतर्गत ग्राहक मोफत पोर्टेबल JioFi डिव्हाइसचा लाभ घेऊ शकतात. हे डिव्हाइस वापरल्यानंतर परत करण्याच्या अटीवर उपलब्ध होईल.

Jio च्या वेबसाइटनुसार, 249 रुपयांच्या नवीन पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये एका महिन्याच्या वैधतेसह 30GB डेटा मिळतो. 299 रुपयांच्या पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये 40GB डेटा उपलब्ध आहे आणि 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50GB डेटा उपलब्ध आहे. प्रत्येक प्लॅन 1 महिन्याच्या वैधतेसह येते. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर इंटरनेट स्पीड 64kbps पर्यंत कमी होईल. 

249 रुपये, 299 रुपये आणि 349 रुपये JioFi पोस्टपेड रिचार्ज प्लॅन निवडणार्‍या ग्राहकांना JioFi 4G वायरलेस पोर्टेबल हॉटस्पॉट मोफत मिळेल. याचा वापर केल्यानंतर ग्राहकांना ते परत करावे लागेल. तसेच, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे या पॅकमध्ये मिळणार नाहीत. JioFi 4G वायरलेस हॉटस्पॉट नॅनो सिमला सपोर्ट करते. 

कंपनीचा दावा आहे की, ते 150mbps च्या स्पीडसह 5 ते 6 तास सर्फिंग देते. यासह, असे सांगण्यात आले आहे की, ते एका वेळी 10 डिव्हाइस कनेक्ट करू शकते. JioFi 4G हॉटस्पॉट डिव्हाइसला कनेक्टिव्हिटीसाठी मायक्रो-USB पोर्ट आणि एक microSD कार्ड स्लॉट मिळतो. यात 2,300mAh बॅटरी आहे. डिव्हाइस 85x55x16mm चा आहे.

Web Title: reliance jio 4 new postpaid plan offers free jiofi 4g wireless hotspot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.