गॅलेक्सी जे७ ड्युओच्या मूल्यात पुन्हा कपात

By शेखर पाटील | Published: August 2, 2018 10:42 AM2018-08-02T10:42:05+5:302018-08-02T10:42:19+5:30

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ ड्युओ या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा कपात करण्याचे जाहीर केले आहे.

Reducing the value of the Galaxy J7 Duo | गॅलेक्सी जे७ ड्युओच्या मूल्यात पुन्हा कपात

गॅलेक्सी जे७ ड्युओच्या मूल्यात पुन्हा कपात

Next

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ ड्युओ या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा कपात करण्याचे जाहीर केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे ७ ड्युओ हा स्मार्टफोन या वर्षीच्या एप्रिल महिन्यात १६,९९० रूपये मूल्यात भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला होता. याच्या मूल्यात दुसर्‍याच महिन्यात एक हजार रूपयांची कपात करण्यात आली होती. यानंतर आता याचे मूल्य पुन्हा एकदा तीन हजारांनी कमी करण्यात आले आहे. यामुळे हे मॉडेल आता ग्राहकांना १३,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. ऑफलाईन शॉपीजसह अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवर नवीन सवलतीच्या दरात हे मॉडेल उपलब्ध करण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे७ ड्युओ या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि एचडी क्षमतेचा (१२८० बाय ७२० पिक्सल्स) सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला असून यावर २.५ डी वक्राकार ग्लासचे आवरण प्रदान करण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी जे७ ड्युओच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशयुक्त १३ व ५ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील आहे. दोन्हींच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येतात. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ओरिओ या अद्ययावत आवृत्तीवर चालणारा आहे. यात फिजीकल होम बटन देण्यात आले आहे. तसेच यामध्ये सॅमसंग कंपनीने विकसित केलेली बिक्सबी हा डिजीटल असिस्टंट दिलेला असून एका बटनाच्या माध्यमातून याला कार्यान्वित करण्याची सुविधा देण्यात आली आहे.  

Web Title: Reducing the value of the Galaxy J7 Duo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.