शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

शानदार 4K डिस्‍प्‍ले आणि 3GB रॅम असलेला Redmi Smart TV लाँच; मिळणार डॉल्बी अ‍ॅटमॉसची मजा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 17:53 IST

Redmi Smart TV: चीनमध्ये Xiaomi नं आपल्या Redmi ब्रँड अंतर्गत Redmi Smart TV X 75 लाँच केली आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 4K डिस्‍प्‍ले, 3GB रॅम आणि 4 स्‍पीकर्स देण्यात आले आहेत.  

Redmi Smart TV X 75 इंचाचा मॉडेल सध्या चीनमध्ये लाँच केला आहे. हा सीरीजमधील तिसरा मॉडेल आहे. या Redmi स्मार्ट टीव्हीमध्ये 120Hz डिस्प्ले रिफ्रेश रेट, MEMC ), HDMI 2.1 इंटरफेस, डॉल्बी विजन अ‍ॅटमॉस आणि 4K रेजॉलूशन सारखे फीचर मिळतात. तसेच यात 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया या स्मार्ट टीव्हीची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स.  

Redmi Smart TV X 75 ची किंमत 

Redmi Smart TV X 75 ची किंमत कंपनीनं सांगितली नाही. परंतु JD.com वर हा मॉडेल 4,999 युआन (सुमारे 59,300 रुपये) मध्ये उपलब्ध झाला आहे. हा मॉडेल ब्लु कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. कंपनीनं या सीरिजच्या भारतीय लाँचची माहिती मात्र दिली नाही. परंतु जेव्हा ही टीव्ही सीरिज देशात येईल तेव्हा तिन्ही मॉडेल्स लाँच केले जातील अशी अपेक्षा आहे.  

Redmi Smart TV X 75 चे स्पेसिफिकेशन्स  

कंपनीने Redmi Smart TV X स्मार्ट टीव्ही फुल मेटल डिजाइनसह सादर केली आहे. तसेच यात बॅकलाईट पॅनलचा वापर करण्यात आला आहे. हा टीव्ही पॅनल 4K (3840×2160 पिक्सल) रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच कंपनीने यात 120Hz चा हाय रिफ्रेश रेट दिला आहे. त्याचबरोबर 8ms रिस्पॉन्स टाइम, 10-bit कलर डेप्थ, 94% P3 कलर गमुट, FreeSync आणि Dolby Vision असे फीचर्स मिळतात.   

चांगल्या ऑडिओ क्वॉलिटीसाठी कंपनीने या टीव्ही मध्ये 4 स्पिकरचा वापर केला आहे. Redmi Smart TV X मध्ये Dolby Atmos सपोर्ट मिळतो. तसेच कनेक्टिविटीसाठी HDMI 2.0 (eARC) पोर्ट, एक HDMI 2.1 (4K120Hz) पोर्ट, एक AV, एक ATV/DTMB, दोन USB पोर्ट, एक S/PDIF, एक RJ-45 आणि चार मायक्रोफोन देण्यात आले आहेत.  

या टीव्ही लाईनअपमध्ये कंपनीने MediaTek MTK 9650 चिपसेटचा वापर केला आहे. ज्यात क्वाड कोर A73 1.5GHz CPU आणि Mali-G52 2EE MC1 GPU देण्यात आले आहेत. तसेच हा टीव्ही 3GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.   

टॅग्स :Televisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान