एक-दोन नव्हे तर सात 5G बँड्ससह येतोय Redmi चा स्वस्त 5G Phone  

By सिद्धेश जाधव | Published: November 23, 2021 07:56 PM2021-11-23T19:56:40+5:302021-11-23T19:56:58+5:30

Redmi Note 11T 5G: Xiaomi आणि Amazon ने आगामी Redmi Note 11T 5G फोनसाठी मायक्रोसाईट लाईव्ह केल्या आहेत. या वेबसाईटवरून आगामी Budget 5G Phone च्या स्पेक्सचा खुलासा होत आहे.  

Redmi note 11t 5g will be the first redmi phone come with 6nm chipset in india  | एक-दोन नव्हे तर सात 5G बँड्ससह येतोय Redmi चा स्वस्त 5G Phone  

एक-दोन नव्हे तर सात 5G बँड्ससह येतोय Redmi चा स्वस्त 5G Phone  

googlenewsNext

Redmi Note 11T 5G ची भारतीय ग्राहक आतुरतेने वाट बघत आहेत. हा फोन येत्या 30 नोव्हेंबरला भारतात दाखल होणार आहे. या लाँच इव्हेंटच्या आधी कंपनी या फोनचे स्पेसिफिकेशन टीज करत आहे. त्यानुसार रेडमी नोट 11टी 5जी फोन 6nm चिपसेटसह येणारा पहिला Redmi फोन असेल. तसेच या फोनमध्ये 7 5G बँड्स देण्यात येतील.  

मनु कुमार जैन यांनी ट्वीट करून दावा केला आहे कि Redmi Note 11T 5G फोन Redmi वेगवान 5G फोन असेल. तसेच या फोनमध्ये 7 बँड मिळतील, ज्यात SA: n1/ n3/ n5/n8/ n28/ n40/ n78 आणि NSA: n1/n3/n40/n78 चा समावेश असेल. विशेष म्हणजे या फोनवर 5जी टेस्टिंगसाठी Jio सोबत भागेदारी केल्याची घोषणा देखील कंपनीने केली आहे.  

Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स    

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीने या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. जो 2.4Ghz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. 

रेडमी नोट 11टी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.   

Web Title: Redmi note 11t 5g will be the first redmi phone come with 6nm chipset in india 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.