शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

जबरदस्त फीचर्स असलेले टॉप ५ स्मार्टफोन्स; किंमत आहे २० हजारांपेक्षाही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 15:25 IST

पाहा कोणते आहेत हे Smartphones, पाहा लिस्ट

ठळक मुद्देया स्मार्टफोन्समध्ये आहेत जबरदस्त फीचर्सकमी किंमतीत मिळतायत अनेक जबरदस्त गोष्टी

15 ते 20 हजार रुपयांचा स्मार्टफोन सेगमेंट खूप लोकप्रिय आहे. मोठ्या संख्येने ग्राहक या किंमतीच्या सेगमेंटमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असतात. परंतु कंपन्यांकडून सातत्यानं नवीन फोन लाँच केल्यामुळे, योग्य फोन निवडणे थोडे अवघड होते. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही निवडक स्मार्टफोन्स आणले आहेत. आपण असे काही स्मार्टफोन्स पाहणार आहोत जे उत्तमही आहेत आणि ज्याची किंमत 20 हजार रूपयांपेक्षाही कमी आहे. Realme Narzo 30 Proहा सध्या देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन आहे. याच्या 6 जीबी रॅम आणि 64 स्टोरेज मॉडेलची किंमत 16,999 रुपये आहे. यात 120hz रिफ्रेश रेट, मीडियाटेक डायमेन्शन 800 यू प्रोसेसर, 48 मेगापिक्सेल + 8  मेगापिक्सेल + 2  मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16  मेगापिक्सेल फ्रन्ट कॅमेरा आणि 5000 एमएएच बॅटरीसह 6.50 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे.

Redmi Note 10 Pro Maxरेडमी नोट 10 प्रो मॅक्स हा स्मार्टफोन नुकताच लाँच झाला आहे. त्याच्या 6 जीबी रॅम आणि 64 स्टोरेज मॉडेलची किंमत 18,999 रुपये आहे. यात 6.67 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसर, 108 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 5 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 एमपी फ्रंट कॅमेरा आणि 5020 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

Samsung Galaxy M31sया स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची मोठी बॅटरी. या स्मार्टफोनमध्ये 6000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 6.5 इंचाचा पंच-होल डिस्प्ले, सॅमसंग एक्सिनोस 9611 प्रोसेसर, 64 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल + 5 मेगापिक्सेल + 5 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Poco X3 Pro या स्मार्टफोनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जबरदस्त कॅमेरा आणि पॉवरफुल प्रोसेसर. या स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम आणि 128 स्टोरेज मॉडेल्सची किंमत 18,999 रुपये आहे. यात 6.67 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर, 48 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि 5160mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo V20 SEसेल्फीच्या चाहत्यांसाठी हा स्मार्टफोन खास आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रन्ट कॅमेरा आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर या स्मार्टफोनच्या 8 जीबी रॅम आणि 128 स्टोरेज मॉडेलची किंमत 19,990 रुपये आहे. यात 6.44 इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर, 48 मेगापिक्सेल + 8 मेगापिक्सेल + 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 4100mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनsamsungसॅमसंगxiaomiशाओमीVivoविवोrealmeरियलमी