12GB रॅम असलेला Realme X7 Max 5G झाला भारतात लाँच; आजपासून घेता येईल विकत  

By सिद्धेश जाधव | Published: June 4, 2021 11:44 AM2021-06-04T11:44:28+5:302021-06-04T11:45:39+5:30

Realme X7 Max 5G Sale: Realme X7 Max 5G भारतात 12GB RAM आणि MediaTek Dimensity 1200 5G चिपसेटसह लाँच केला गेला आहे. 

Realme x7 max 5g available on flipkart for sale from 4 june   | 12GB रॅम असलेला Realme X7 Max 5G झाला भारतात लाँच; आजपासून घेता येईल विकत  

Realme X7 Max 5G मध्ये 12जीबी रॅम आणि मीडियाटेक डायमनसिटी 1200 चिपसेट देण्यात आला आहे.

Next

Realme ने काही दिवसांपूर्वी भारतात Realme X7 Max 5G लाँच केला होता. या फोनमध्ये 12जीबी रॅम आणि मीडियाटेक डायमनसिटी 1200 चिपसेट देण्यात आला आहे. रियलमी एक्स7 मॅक्सची किंमत 26,999 रुपयांपासून सुरु होते आणि हा आज म्हणजे 4 जूनपासून ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. (Realme X7 Max 5G price will start from 26,999 Rs.) 

Realme X7 Max 5G ची किंमत  

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी भारतात दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनचा छोटा व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. यातील 8GB + 128GB मॉडेल 26,999 रुपये तर 12GB + 256GB मॉडेल 29,999 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. 

Realme X7 Max 5G चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी एक्स7 मॅक्स 5जी फोन कंपनीने 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.43 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच केला गेला आहे. यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 360हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. फोन अँड्रॉइड 11 ओएसवर लाँच झाला आहे. तर प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 1200 चिपसेट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये 7 5G बॅंड आहेत.  

रियलमी एक्स7 मॅक्स 5जीमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेंसर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आह. या फोनसेल्फसेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. 

Realme X7 Max 5G मध्ये 4,500एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हि बॅटरी 50W SuperDart Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

Web Title: Realme x7 max 5g available on flipkart for sale from 4 june  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.