टॅबलेट सेगमेंटमध्ये उतरण्यास रियलमी सज्ज! Realme Pad च्या लाँचची तारीख आली समोर
By सिद्धेश जाधव | Updated: August 25, 2021 20:01 IST2021-08-25T20:01:15+5:302021-08-25T20:01:57+5:30
Realme Pad मधील प्रोसेसरची माहिती मिळू शकली नाही. परंतु या टॅबमध्ये 7100mAh बॅटरी देण्यात येईल.

टॅबलेट सेगमेंटमध्ये उतरण्यास रियलमी सज्ज! Realme Pad च्या लाँचची तारीख आली समोर
रियलमी सध्या वेगवेगळ्या सेगमेंट मध्ये हात आजमावत आहे. नुकताच कंपनीने आपला पहिला लॅपटॉप Realme Book लाँच केला होता. आता कंपनी आपला पहिला टॅबलेट डिवाइस सादर करण्याची तयारी करत आहे. हा टॅबलेट Realme Pad नावाने सादर केला जाईल, याची माहिती याआधीच आली आहे. आता या टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्ससह लाँच डेटची माहिती देखील लीक झाली आहे.
Realme Pad लाँच डेट
प्रसिद्ध इंडियन यूट्यूबर Sahil Karoul ने Realme Pad च्या लाँच डेटची माहिती ट्विटरवरून दिली आहे. साहिलने सांगितले आहे कि, Realme Pad पुढल्या महिन्यात 9 सप्टेंबर 2021 रोजी लाँच केला जाईल. हा लाँच फक्त चीनपुरता मर्यादित असेल कि रियलमी पॅड भारतासह जागतिक बाजारात देखील येईल, हे मात्र स्पष्ट झाले नाही.
Realme Pad चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Realme Pad दोन मॉडेल्समध्ये सादर केला जाऊ शकतो. यात Wi-Fi ओन्ली आणि Wi-Fi + LTE अश्या दोन व्हेरिएंट्सचा समावेश असेल. या टॅबमध्ये 10.4-इंचाची मोठी स्क्रीन मिळेल, हा एक अॅमोलेड पॅनल असेल. यातील प्रोसेसरची माहिती मिळाली नाही, परंतु या टॅबमध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.
या टॅबमध्ये 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज मिळू शकते. हा टॅबलेट Android 11 आधारित रियलमी युआयवर चालेल. फोटोग्राफीसाठी रियलमीच्या टॅबमध्ये 8MP चा रियर आणि फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच यात 7,100mAh ची दमदार बॅटरी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सपोर्टसह दिली जाऊ शकते.