स्वस्तात मस्त रियलमी फोन सादर! 43 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Narzo 50i भारतात लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: September 24, 2021 03:06 PM2021-09-24T15:06:29+5:302021-09-24T15:10:15+5:30

Low budget Phone Realme Narzo 50i Price: Realme Narzo 50i स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहे. कंपनीने या फोनची किंमत 9 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे.

Realme narzo 50i launched in india check price and specifications  | स्वस्तात मस्त रियलमी फोन सादर! 43 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Narzo 50i भारतात लाँच  

स्वस्तात मस्त रियलमी फोन सादर! 43 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह Realme Narzo 50i भारतात लाँच  

Next
ठळक मुद्देकंपनीने या फोनची किंमत 9 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे.Realme Narzo 50i स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहे.

Realme ने आपल्या नव्या Narzo 50 सीरीज अंतर्गत Realme Narzo 50A आणि Realme Narzo 50i असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यापैकी Narzo 50i स्मार्टफोन स्वस्त स्मार्टफोन आहे. कंपनीने या फोनची किंमत 9 हजार रुपयांच्या आत ठेवली आहे. 5000mAh बॅटरीसह येणारा हा फोन फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.  

Realme Narzo 50i ची किंमत 

Realme Narzo 50i स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 2GB RAM आणि 32GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे, ज्याची किंमत 7,499 रुपये आहे. तर या फोनचा दुसरा व्हेरिएंट 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. या फोनचा सेल Flipkart Big Billion days च्या पहिल्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला सुरु होईल.  

Realme Narzo 50i चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Narzo 50i मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये Unisoc 9863 चिपसेट प्रोसेसिंगचे काम करतो. फोनमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची बिल्टइन स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI Go एडिशन चालतो. 

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा एआय रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर या फोनच्या फ्रंटला 5-मेगापिक्सलचा एआय सेल्फी शुटर मिळतो. Realme Narzo 50i मध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 43 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.  

Web Title: Realme narzo 50i launched in india check price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app