शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

5000mAh च्या मोठ्या बॅटरीसह आला रियलमीचा स्वस्त 5G फोन; सॅमसंग-शाओमीला झटका  

By सिद्धेश जाधव | Published: May 18, 2022 2:50 PM

Realme Narzo 50 5G स्मार्टफोन 6GB रॅम, 5000mAh बॅटरी आणि 90Hz रिफ्रेश रेटसह आला आहे.  

रियलमीनं आज भारतात दोन दमदार 5G स्मार्टफोन सादर केले आहेत. Realme Narzo 50 5G आणि Narzo 50 Pro 5G स्मार्टफोन भारतात आले आहेत. यातील स्वस्त स्मार्टफोन Realme Narzo 50 5G मीडियाटेकच्या Dimensity 810 5G प्रोसेसरसह बाजारात सादर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग मिळते.  

Realme Narzo 50 5G चे स्पेसिफिकेशन्स 

realme Narzo 50 5G स्मार्टफोन 6.6 इंचाच्या फुल एचडी डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅंप्लिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनी सेगमेंटमधील सर्वात फास्ट 5G प्रोसेसर MediaTek Dimensity 810 5G दिला आहे. त्याचबरोबर 6GB पर्यंत रॅम आणि 5GB व्हर्च्युअल रॅम मिळतो. सोबत 128GB पर्यंतची स्टोरेज मिळते.  

Realme Narzo 50 5G स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा मिळतो. एलईडी फ्लॅश, 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ब्लॅक अँड व्हाइट सेकंडरी कॅमेरा या सेटअपमध्ये आहे. फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या अँड्रॉइड 12 आधारित Realme UI 3.0 वर चालणाऱ्या स्मार्टफोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. यातील 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Realme Narzo 50 5G ची किंमत 

Realme Narzo 50 5G स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट आले आहेत. 4GB/64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 15,999 रुपये आहे. तर 4GB/128GB स्टोरेज आणि 6GB/128GB स्टोरेज मॉडेल्सची अनुक्रमे 16,999 रुपये आणि 17,999 रुपये किंमत आहे. हा फोन हायपर ब्लू आणि हायपर ब्लॅक कलर व्हेरिएंट्समध्ये अ‍ॅमेझॉन आणि रियलमीच्या वेबसाईटवरून 24 मेपासून विकत घेता येईल.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन