रियलमीने केला स्वस्त 5G स्मार्टफोन सादर; Realme Narzo 30 5G स्मार्टफोन भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: June 24, 2021 02:27 PM2021-06-24T14:27:55+5:302021-06-24T14:28:53+5:30

Realme Narzo 5G launch: Realme Narzo 30 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आली आहे. ज्यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. 

Realme Narzo 30 5g launched in india check price and specifications  | रियलमीने केला स्वस्त 5G स्मार्टफोन सादर; Realme Narzo 30 5G स्मार्टफोन भारतात लाँच 

Realme Narzo 30 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आली आहे.

Next

Realme ने भारतात आपली Narzo 30 सीरीज लाँच केली आहे. कंपनीने या सीरिजमध्ये Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G असे दोन स्मार्टफोन केले आहेत. नावावरून तुम्हाला समजले असेल कि यातील एक स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे तर दुसरा फोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. या लेखात आपण Realme Narzo 30 5G स्मार्टफोनची माहिती बघणार आहोत.  

Realme Narzo 30 5G ची डिजाइन 

Realme Narzo 30 5G मध्ये फ्रंटला सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. या फोनच्या मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. फोनच्या उजवीकडे पावर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तर डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. फोनच्या बॅक पॅनलवर रेसिंग डिजाइन पॅटर्नसह रियलमी नारजोचा लोगो दिसत आहे. 

Realme Narzo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Narzo 30 5G मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल FHD+ डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेकच्या Dimensity 700 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. फोन 6 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मिळते. Narzo 30 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीने Android 11 आधारित Realme UI 2.0 दिला आहे.  

Realme Narzo 30 5G च्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सोबत मॅक्रो आणि ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत. हा फोन 16 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह येतो.  

Realme Narzo 30 5G ची किंमत  

Realme Narzo 30 5G स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतात लाँच करण्यात आली आहे. ज्यात 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन कंपनीने भारतात 15,999 रुपयांमध्ये सादर केला आहे. Narzo 30 5G स्मार्टफोनचा पहिला सेल 30 जूनला होणार आहे. या सेलमध्ये या स्मार्टफोनवर 500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. 

Web Title: Realme Narzo 30 5g launched in india check price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.