Realme करतेय प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम; सॅमसंग-शाओमीला देऊ शकते आव्हान
By सिद्धेश जाधव | Updated: November 6, 2021 15:20 IST2021-11-06T15:20:19+5:302021-11-06T15:20:43+5:30
रियलमीकडे सध्या सर्वात महागडरा Realme GT 5G हा सर्वात महागडा स्मार्टफोन आहे. जो 37,999 रुपयांमध्ये विकत घेता येतो, कंपनीचा आगामी स्मार्टफोन यापेक्षा महाग असू शकतो.

Realme करतेय प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम; सॅमसंग-शाओमीला देऊ शकते आव्हान
रियलमी एका नवीन फ्लॅगशिप फोनवर काम करत आहे. हे के प्रीमियम फोन असेल, जो कंपनी पुढील वर्षी ग्राहकांच्या भेटीला आणू शकते. रियलमी वाईस प्रेसिडेंट Xu Qi ने चायना मोबाईल ग्लोबल पार्टनर्स कांफ्रेंसमध्ये याचा खुलासा केला आहे. त्यांनी कंपनी हाय-एन्ड स्मार्टफोन मार्केटमध्ये पाऊल टाकणार आहे. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या डिवाइसची प्राईस रेंज देखील सांगितली आहे. त्यानुसार, रियलमीचा नवीन प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन 5000 युआनच्या बजेटमध्ये सादर केला जाईल, जे 58,000 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होतात.
रिपोर्ट्सनुसार कंपनी या फोनची घोषणा पुढील वर्षी करणार आहे. पुढीलवर्षी अनेक हाय-एन्ड स्मार्टफोन बाजारात दाखल करू शकते. ज्यांची किंमत 5,000 चायनीज युआनच्या आसपास असू शकते. या फोनमध्ये फिचर कोणते असतील किंवा कोणत्या स्पेक्सचा समावेश असेल, हे मात्र अजूनही समोर आले नाही. रियलमीचा हा प्रीमियम स्मार्टफोन शाओमीच्या अल्ट्रा लाइनअपला टक्कर देण्यासाठी बाजारात येऊ शकते.
आतापर्यंत रियलमीने X आणि GT अशा दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज भारतात सादर केल्या आहेत. यातील एक्स सीरिजमध्ये नवीन फोन सादर न करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. तर जीटी सीरिजमध्ये सर्वात महागड्या Realme GT 5G ची किंमत 37,999 रुपये आहे. आगामी प्रीमियम स्मार्टफोन यापेक्षा जास्त किंमतीत सादर केला जाईल. त्यामुळे त्या फोनमधील स्पेक्स देखील दर्जेदार असू शकतात.