काही मिनिटांत फुल चार्ज होईल Realme चा नवा स्मार्टफोन; 12GB रॅम असूनही परवडणारी किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: April 29, 2022 03:32 PM2022-04-29T15:32:58+5:302022-04-29T15:33:42+5:30

Realme GT Neo3 5G फोन भारतात 150W फास्ट चार्जिंग, 12GB RAM, MediaTek Dimensity 8100 चिपसेट आणि 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे.

Realme GT Neo3 5G Launched In India With 150W Fast Charging Price Specifications Sale Offer  | काही मिनिटांत फुल चार्ज होईल Realme चा नवा स्मार्टफोन; 12GB रॅम असूनही परवडणारी किंमत 

काही मिनिटांत फुल चार्ज होईल Realme चा नवा स्मार्टफोन; 12GB रॅम असूनही परवडणारी किंमत 

Next

रियलमीनं आज भारतात Realme GT Neo3 5G नावाचा दणकट डिवाइस सादर केला आहे. याची खासियत म्हणजे यात 150W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे, जी काही मिनिटांत फोन फुल चार्ज करते. त्याचबरोबर 12GB RAM, MediaTek Dimensity 8100 चिपसेट आणि 120Hz रिफ्रेश रेट असे फीचर्स देखील मिळतात. एवढे दमदार फीचर्स असूनही या फोनची किंमत 37 हजारांपासून सुरु होते, यावर 7 हजार रुपयांची सूट देखील आहे.  

Realme GT Neo3 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo3 च्या मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.  

Realme GT Neo3 मध्ये अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी माली जी610 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. हा फोन व्हीसी कुलिंग टेक्नॉलॉजीमुळे हेव्ही प्रोसेसिंग नंतर देखील थंड राहतो. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.  

रियलमी जीटी नियो 3 टेक मंचावर 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज रिस्पॉन्स रेटला सपोर्ट करतो. या पंच-होल पॅनलला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. Realme GT Neo3 चे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीडचे दोन मॉडेल आहेत. यातील 4,500एमएएचच्या बॅटरीसह 150वॉट फास्ट चार्जिंग मिळते. तर 5,000एमएएच बॅटरी असलेला मॉडेल 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 

Realme GT Neo3 ची किंमत 

  • Realme GT Neo3 80W 8GB/128GB: 36,999 रुपये  
  • Realme GT Neo3 80W 12GB/256GB: 38,999 रुपये  
  • Realme GT Neo3 150W 12GB/256GB: 42,999 रुपये   

हा नवीन रियलमी मोबाईल 4 मेपासून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत एसबीआयच्या कार्ड धारकांना 7,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. 

Web Title: Realme GT Neo3 5G Launched In India With 150W Fast Charging Price Specifications Sale Offer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.