शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

Realme X50 Pro 5G वर मिळत आहे 17 हजार रुपयांची सूट; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

By सिद्धेश जाधव | Updated: June 5, 2021 13:24 IST

Realme 3rd Anniversary Sale: Realme ला भारतात 3 वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे Flipkart वर 3rd Realme Anniversary sale सुरु आहे, या सेलमध्ये प्रीमियम स्मार्टफोन Realme X50 Pro 5G वर 17 हजार रुपयांची सूट मिळत आहे.  

Oppo चा सब-ब्रँड म्हणून भारतात प्रवेश करणाऱ्या Realme ला भारतात येऊन तीन वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने कंपनीने रियलमीने ऑनलाइन शॉपिंग साइट Flipkart वर 3rd Realme Anniversary sale ची सुरुवात केली आहे. 4 ते 8 जून दरम्यान सुरु राहणाऱ्या या सेल मध्ये बजेट, मिड रेंज आणि प्रीमियम स्मार्टफोन्सवर डिस्काउंट आणि निरनिराळ्या ऑफर्स मिळत आहेत. या सेलमध्ये रियलमीच्या प्रीमियम स्मार्टफोन Realme X50 Pro 5G वर 17 हजार रुपयांची सूट मिळत आहे.  

डिस्काउंटनंतर किंमत  

रियलमी एक्स50 प्रो 5जीच्या 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटवर 17 हजार रुपयांची सूट मिळत आहे. या फोनचा 8जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 24,999 रुपयांमध्ये मिळत आहे, याची मूळ किंमत 41,999 रुपये आहे. त्याचप्रमाणे 47,999 रुपयांमध्ये मिळणारा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 17 हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर 30,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme X50 Pro 5G चे स्पेसिफिकेशन  

Realme X50 Pro 5G हा गेल्यावर्षी लाँच झालेला प्रीमियम फोन आहे. या फोनमध्ये 6.44 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. या फोनच्या स्क्रीनचे रिजोल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. अँड्रॉइड 10 सह लाँच झालेला फोन आता अँड्रॉइड 11 वर अपडेट झाला आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 865 प्रोसेसर आहे. 

Realme X50 Pro 5G मध्ये मागे क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, यात मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर 12 मेगापिक्सलची टेलिफोटो लेंस, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड वाइट सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात डुअल फ्रंट कॅमेरा मिळतो, ज्यात मुख्य सेन्सर 32 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये 4200 mAh ची बॅटरी आहे, जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन