रेडमीची बोलती बंद! Realme नं सादर केला दमदार ‘Speed Edition’ फोन; कमी किंमतीत सुपर फास्ट परफॉर्मन्स
By सिद्धेश जाधव | Updated: March 12, 2022 17:31 IST2022-03-11T12:13:22+5:302022-03-12T17:31:10+5:30
Realme 9 SE 5G मधील एसईचा अर्थ Speed Edition असा आहे. जो Snapdragon 778G चिपसेट, 144Hz रिफ्रेश रेट आणि 30W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह सादर झाला आहे.

रेडमीची बोलती बंद! Realme नं सादर केला दमदार ‘Speed Edition’ फोन; कमी किंमतीत सुपर फास्ट परफॉर्मन्स
Realme नं आपल्या Realme 9 सीरिजचा विस्तार केला आहे. दोन Pro मॉडेल सादर केल्यानंतर आता Realme 9 5G आणि Realme 9 SE 5G हे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यातील एसई अर्थात Speed Edition (स्पीड एडिशन) स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Realme 9 SE 5G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.
Realme 9 SE 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme 9 5G SE स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटसह मिळाला आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 778G चिपसेटसह आला आहे सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 642L सपोर्ट मिळतो. रियलमीचा हा स्मार्टफोन 8GB पर्यंत LPDDR4x RAM आणि 128GB UFS 2.1 स्टोरेजसह सादर केला गेला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते.
Realme 9 5G SE स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2MP B&W लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी सोबत साइड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यातील 5,000mAh ची मोठी बॅटरी आणि 30W Dart फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Realme 9 SE 5G ची किंमत
Realme 9 5G SE स्मार्टफोनच्या 6GB + 128GB मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे, तर 8GB + 128GB व्हेरिएंट 22,999 रुपयांमध्ये सादर केला गेला आहे. हा डिवाइस रियलमीची वेबसाईट आणि फ्लिपकार्टवर 14 मार्चपासून व्हाईट आणि ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
- ‘या’ कंपनीनं केली कमाल; 15 हजारांच्या आत 11GB RAM सह 5G Phone भारतात लाँच
- iPhone 13 Mini वर मोठा डिस्काउंट; किफायतशीर आयफोनला देखील देतोय टक्कर
- सावधान! 'या' अँड्रॉइड स्मार्टफोन्सना हॅकिंगचा धोका! Samsung युजर्ससाठी धोक्याची घंटा, असा करा बचाव