कोकणापाठोपाठ विदर्भातही पावसाचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2015 23:13 IST2015-07-10T23:13:32+5:302015-07-10T23:13:32+5:30
कोकणापाठोपाठ विदर्भातही पाऊस

कोकणापाठोपाठ विदर्भातही पावसाचे आगमन
क कणापाठोपाठ विदर्भातही पाऊसपुणे : पंधरा दिवसांपासून राज्यातून गायब झालेल्या पावसाने कोकणापाठोपाठ विदर्भातही पुनरागमन केले. गेल्या २४ तासांत कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. पुढील २४ तासांत कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. अरबी समुद्रात केरळपासून कर्नाटकापर्यंतच्या किनारपीवर हवेचा कमी दाबाचा पा सक्रिय आहे. त्यामुळे कोकणात तीन दिवसांपासून पाऊस पडत आहे. आता पिम बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पा सक्रिय झाला आहे. तो आता झारखंड राज्याच्या बाजूला सरकला आहे. त्यामुळे विदर्भातही मॉन्सून सक्रिय झाला असून, तेथेही पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासांत सांगे येथे सर्वाधिक १०० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यापाठोपाठ विदर्भातील कोर्ची येथे ६०, केपे, आमगाव, सालेकसा येथे ५०, गोंदिया ४०, कर्जत, वेंगुर्ला, भंडारा, कुरखेडा, साकोली येथे ३०, कणकवली, मालवण, सावंतवाडी, मोरगाव, रामटेक येथे २०, चिपळूण, कुडाळ, माथेरान, पेण, राजापूर, देसाईगंज, नागपूर येथे १० मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. महाबळेश्वरमध्ये ३०, गगनबावड्यामध्ये २० आणि चंदगड येथे १० मिलिमीटर पाऊस पडला. ---