राज्यातून पावसाचे प्रमाण होणार कमी

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30

पुढील २४ तासात कोकणातच मुसळधार पावससाची शक्यता

Rainfall from the state will decrease | राज्यातून पावसाचे प्रमाण होणार कमी

राज्यातून पावसाचे प्रमाण होणार कमी

ढील २४ तासात कोकणातच मुसळधार पावससाची शक्यता

पुणे : मराठवाडा वगळता गेल्या आठवडयाभरापासून राज्याच्या सर्वदूर भागांमध्ये पडणार्‍या पावसाचे प्रमाण पुढील ४८ तासात कमी होणार आहे आणि पाऊस कोकणापुरता मर्यादित राहणार आहे. पुढील दोन दिवसात केवळ कोकणात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याची नोंद झाली.
अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाला आहे. तो आज गुजरात राज्याकडे सरकला. तसेच बंगालच्या उपसागरातही हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय असून तो पि›म बंगाल, झारखंड व बांग्लादेशाच्या भागांवर सरकला आहे. त्यामुळे राज्यात बरसणार्‍या मॉन्सूनसाठीची अनुकुल स्थिती कमी झाली आहे. केरळच्या किनारपट्टीपासून गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय आहे. त्यामुळे केवळ कोकणातच मॉन्सूनला बरसण्यासाठी अनुकुल स्थिती आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये अतिवृष्टी झाली. तेथे २७० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यापाठोपाठ इगतपुरीमध्ये २१० मिमी, भिरा २००, महाड, गगनबावडा १८०, माथेरान, पाली १७०, रोहा, पुणे-वडगाव मावळ १५०, चिपळूण, कर्जत, तळा, पुणे-वेल्हा १४०, पुणे-मुळशी १३०, कणकवली, पोलादपूर १२०, माणगाव, शहापूर, गारगोटी १००, अंबरनाथ, कल्याण, ठाणे, आजरा ९०, दापोली, हर्णे, पनवेल, राजापूर, संगमेश्वर, राधानगरी, शाहूवाडी ८०, भिवंडी, देवगड, पुणे, श्रीवर्धन, उरण, पन्हाळा, पाटण ७०, गुहागर, मुंबई, मुरूड, उल्हासनगर, अकोले, पुणे-चिंचवड, पुणे-राजगुरूनगर, पुणे, निफाड, सातारा, शिराळा ५०, कुडाळ, पालघर, रत्नागिरी, विक्रमगड, पुणे-आंबेगाव, पुणे-जुन्नर, कोल्हापूर, वाई ४०, डहाणू, मालवण, सावंतवाडी, गडहिंग्लज, कागल, नंदुरबार, ओझर, सिन्नर, विटा ३०, अलिबाग, वेंगुर्ला, दिंडोरी, हातकणंगले, कराड, खंडाळा, पुणे-सासवड, सटाणा, शहादा, तासगाव, इस्लामपूर, येवला २०, अहमदनगर, अमळनेर, चाळीसगाव, पुणे-दौंड, धुळे, जळगाव, कोपरगाव, मालेगाव, नेवासा, साक्री, संगमनेर, सांगली, श्रीगोंदा, श्रीरामपूर, औरंगाबाद, चिखलदरा येथे १० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.
घाटमाथ्यांवरही मुसळधार पाऊस पडत असून गेल्या २४ तासात अम्बोणे घाटात ३६० मिमी, ताम्हिणी घाटात ३४०, दावडी घाटात ३३०, शिरगाव घाटात ३१०, लोणावळा घाटात २७०, वळवण गावात २५०, डुंगरवाडी घाटात २४०, भिरा घाटात २००, खोपोली, कोयना घाटात १६० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

Web Title: Rainfall from the state will decrease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.