न्हावेखाडीचा विकास तीन टप्प्यांत पूर्ण करणार - प्रज्ञा सरवदे
By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30
पनवेल : विधायक कामातून न्हावेखाडीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सिडको सज्ज झाली असून तीन टप्प्यांत याठिकाणची कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास दक्षता विभागाच्या प्रमुख तथा अप्पर पोलीस महासंचालिका प्रज्ञा सरवदे यांनी व्यक्त केला. न्हावेखाडी संघर्ष समितीबरोबर झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

न्हावेखाडीचा विकास तीन टप्प्यांत पूर्ण करणार - प्रज्ञा सरवदे
प वेल : विधायक कामातून न्हावेखाडीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सिडको सज्ज झाली असून तीन टप्प्यांत याठिकाणची कामे पूर्ण केली जातील, असा विश्वास दक्षता विभागाच्या प्रमुख तथा अप्पर पोलीस महासंचालिका प्रज्ञा सरवदे यांनी व्यक्त केला. न्हावेखाडी संघर्ष समितीबरोबर झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया यांच्या निर्देशानुसार, गेल्या महिन्यातच सिडकोच्या अधिकार्यांनी न्हावेखाडी परिसराची पाहणी केली होती. यावेळी ग्रामस्थांनी परिसरातील गावांच्या झालेल्या दुरवस्थेची माहिती दिली. येथील ग्रामस्थांनाही मुख्य प्रवाहात आणण्याचे आश्वासन यावेळी सरवदे यांनी दिले. या आश्वासनाची पूर्तता सिडकोने शनिवारी झालेल्या बैठकीत केली. न्हावेखाडी संघर्ष समितीच्या पदाधिकार्यांबरोबर झालेल्या बैठकीत यावेळी सिडकोचे मुख्य अभियंता के. वरखेडकर, दक्षता विभागाच्या प्रमुख प्रज्ञा सरवदे , ए.बी. पवार उपस्थित होते. संघर्ष समितीचे नेतृत्व कांतीलाल कडू यांनी केले. यावेळी कामांची टप्प्याटप्प्यात विभागणी सिडको अधिकार्यांच्या वतीने करण्यात आली. त्यामध्ये पहिला टप्पा ३० जूनपर्यंत, दुसरा टप्पा ३१ जुलै, तर तिसरा टप्पा ३० ऑगस्टपर्यंत पूर्ण करणार असल्याचे सिडकोचे मुख्य अभियंता के. वरखेडकर यांनी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले. परिसरातील शाळेची इमारत, शौचालये, अंतर्गत नाले, स्मशानभूमी आदीच्या कामांना पहिल्या टप्प्यात प्राधान्य दिले जाणार आहे. याठिकाणच्या असणार्या गावांना धोका ओळखून अस्तित्वात असलेल्या बंधार्याची डागडुजी आणि वाढीव काम दुसर्या टप्प्यात करण्याचे ठरले. काही ठिकाणी असलेली खारफुटी विकासकामांच्या आड येत असल्यास पर्यावरण खात्याची परवानगी घेवून पुढील विकासकामे केली जातील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. गावातील मुख्य रस्ते, मंदिरासमोरचे सुशोभीकरण आदी दुसर्या टप्प्यात करण्याचे यावेळी ठरले. उड्डाणपूल, मैदान, बगिचा, नाना नानी पार्क, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, व्यायामशाळा, वाचनालय आदीचा तिसरा टप्प्यात समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये २५ कामांचा समावेश असून १० कोटींची ही विकासकामे न्हावेखाडी परिसरात होणार आहेत. ही विकासकामे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना मिळावी यासाठी काही तरतूद सिडको करणार आहे का, असा प्रश्न यावेळी कडू यांनी विचारला असता ई -टेंडरिंगसाठी प्रकल्पग्रस्त ठेकेदारांना प्रशिक्षण दिले जाईल, असे आश्वासन के. वरखेडक र यांनी दिले. यावेळी उपस्थितांमध्ये टी.एम .म्हात्रे, गोपाळ कडू, सी.ठाकूर, अरुण ठाकूर, प्रकाश कडू, राजन कडू, शैलेश ठाकूर, विष्णू ठाकूर यांच्यासह तीस जणांच्या प्रतिनिधी मंडळाचा या बैठकीत समावेश होता. (प्रतिनिधी)