शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

OPPO Reno 7 5G: काही मिनिटांत चार्ज होणार हा दमदार फोन; 12GB RAM आणि 64MP Camera सह घेता येणार विकत  

By सिद्धेश जाधव | Updated: November 26, 2021 12:32 IST

OPPO Reno 7 5G Phone Price: OPPO Reno 7 5G चीनमध्ये 90hz Refresh Rate, Snapdragon 778G प्रोसेसर, 12GB RAM, 64MP Camera आणि वेगवान 65W फास्ट चार्जिंग अशा स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे.

OPPO ची बहुप्रतीक्षित Reno 7 Series टेक मंचावर सादर करण्यात आली आहे. कंपनीनं Oppo Reno 7 5G, Oppo Reno 7 Pro 5G आणि Oppo Reno 7 SE 5G हे तीन शानदार स्मार्टफोन लाँच केले आहेत. या लेखात आपण Oppo Reno 7 5G Phone ची माहिती घेणार आहोत. हा फोन 90hz Refresh Rate, Snapdragon 778G प्रोसेसर, 12GB RAM, 64MP Camera आणि वेगवान 65W फास्ट चार्जिंग अशा भन्नाट स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला आहे.  

OPPO Reno 7 5G चे स्पेसिफिकेशन्स 

OPPO Reno 7 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अ‍ॅमोलेड पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा मिळते. फोनचे मॉर्निग गोल्ड, स्टारी नाईट ब्लॅक आणि स्टार रेन विश हे तीन कलर व्हेरिएंट आले आहेत. 

OPPO Reno 7 5G अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.  

Reno 7 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. पॉवर बॅकअपसाठी हा ओप्पो फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीने काही मिनिटांत चार्ज करता येईल.  

OPPO Reno 7 5G ची किंमत 

ओप्पोचे तीन व्हेरिएंट्स चीनमध्ये उपलब्ध झाले आहेत. 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला बेस व्हेरिएंट 2699 युआन (सुमारे 31,500 ₹) मध्ये लाँच करण्यात आला आहे. तर 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजची किंमत 2999 युआन (सुमारे 35,000 ₹) ठेवण्यात आली आहे. OPPO Reno 7 5G च्या 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज मॉडेलसाठी 3299 युआन (सुमारे 38,500 ₹) मोजावे लागतील.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान