OPPO च्या भन्नाट फोल्डेबल स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

By सिद्धेश जाधव | Published: November 30, 2021 12:41 PM2021-11-30T12:41:45+5:302021-11-30T12:42:27+5:30

OPPO Foldable Phone: OPPO चा आगामी Foldable Phone कंपनीच्या फाईंड एक्स सीरिज अंतर्गत OPPO Find N नावानं सादर केला जाऊ शकतो.

Oppo foldable smartphone display and camera specifications leaked  | OPPO च्या भन्नाट फोल्डेबल स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

OPPO च्या भन्नाट फोल्डेबल स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

googlenewsNext

Oppo लवकरच आपला फोल्डेबल स्मार्टफोन सादर करणार आहे. आता या अनोख्या फोनचे महत्वाचे स्पेसिफिकेशन लीक झाले आहेत. यात डिस्प्ले आणि कॅमेरा स्पेसिफिकेशन्सचा समावेश आहे. त्याचबरोबर या Foldable Phone च्या डिजाईन, नाव आणि किंमतीची माहिती देखील रिपोर्ट्समधून मिळाली आहे. 

OPPO Foldable Phone 

टिपस्टर Digital Chat Station नुसार, आगामी OPPO फोल्डेबल फोन इनर फोल्डिंग डिजाईनसह सादर केला जाईल. त्यामुळे यात बाहेरील आणि आतील अशा दोन स्क्रीन मिळतील. बाहेरील डिस्प्ले कर्व डिजाइनसह सादर केला जाऊ शकतो, ज्याचा आकार 6.5 इंच असेल. या फोनचा बाहेरील डिस्प्ले पंच होल कटआउटसह सादर केला जाईल. ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz असू शकतो. 

तर आतील डिस्प्ले 8 इंचाची पंच होल असलेली फ्लॅट स्क्रीन असेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. लिक्स्टरनुसार, या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोल्डेबल फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 50MP IMX766 प्रायमरी कॅमेरा आणि 16MP IMX481 सेकंडरी सेन्सर आणि 13MP S5K3M5 हा थर्ड सेन्सर मिळेल. फोनमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.  

रिपोर्ट्सनुसार, OPPO चा आगामी फोल्डेबल स्मार्टफोन OPPO Find सीरीज अंतर्गत OPPO Find N नावाने सादर केला जाईल. या फोनला क्वालकॉमच्या पॉवरफुल चिपसेट Snapdragon 8 Gen1 किंवा Snapdragon 888+ चिपसेटची ताकद मिळू शकते. हा फोल्डेबल फोन 10,000 युआन (सुमारे 1,17,000 रुपये) मध्ये पुढील वर्षी सादर केला जाऊ शकतो.  

Web Title: Oppo foldable smartphone display and camera specifications leaked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.