शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 7:00 PM

12 GB RAM, 256 GB स्टोरेज, पाहा आणखी काय आहेत जबरदस्त फीचर्स

ठळक मुद्देOppo Find X3 Pro मार्च महिन्यात होणार लाँचयामध्ये पॉवरफुल Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरही देण्यात आला आहे

काही दिवसांपूर्वीच Oppo नं आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Reno 5 Pro 5G लाँच केला होता. या फोनबाबत युझर्समध्ये मोठा उत्साह दिसून आला होता. आता मार्च महिन्यात Oppo आपला आणखी एक फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. याचा लूक आणि स्पेसिफिकेशन्सही जबरदस्त आहेत. लाँचपूर्वीच याचे सर्व स्पेसिफिकेशन्स जारी करण्यात आल्यानं ग्राहकांमध्येही उत्साह दिसून येत आहे. Oppo Find X3 Pro चा लूक आणि स्पेसिफिकेशन्स जबरदस्त असून ओप्पो पुन्हा एकदा प्रिमिअम सेगमेंटमध्ये आपलं नाव कोरणार असल्याचं दिसून येत आहे. Oppo Find X3 Pro च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल सांगायचं झालं तर यात 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच त्याचं रिझॉल्युशन 1440*3216 पिक्सेल आहे. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेच 120Hz पर्यंत आहे. Oppo Find X3 Pro हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर सोबत 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेजसह लाँच केला जाईल. तसंच या स्मार्टफोनमध्ये 4500 mAh ची ड्युअल सेल बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन 65W Super VOOC 2.0 वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 30W VOOC Air wireless flash चार्जिंग सपोर्टसह येतो. 

कॅमेराही भन्नाटColorOS 11.2 वर बेस्ड असलेल्या Oppo Find X3 Pro च्या कॅमेऱ्याबद्दल सांगायचं झालं तर यात क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. तसंच यात 50 मेगापिक्सेलचा  Sony IMX766 सेन्सरही आहे. यात अल्डावाईड लेन्सदेखील देण्यात आली असून 13 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर 2x optical zoom सह येतो. याव्यतिरिक्त यात 3MP ची मायक्रो लेन्स देण्यात आली असून ती  25x zoom सोबत येतो. ओप्पोचा या स्मार्टफोनमध्ये OFILM लेन्स देण्यात आली असून ती सुपरझूम फीचर्ससोबत येते. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानoppoओप्पोSmartphoneस्मार्टफोन