शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सेल्फी क्वीनला देखील द्याल मात; 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह OPPO चे दोन फोन आले

By सिद्धेश जाधव | Updated: April 12, 2022 18:59 IST

Oppo F21 Pro Series भारतात Qualcomm प्रोसेसर, 64MP रियर कॅमेरा, 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि फायबर ग्लास लेदर डिजाइनसह लाँच झाली आहे.  

OPPO कंपनीनं भारतात OPPO F21 Pro Series सादर केली आहे. या सीरिजमध्ये Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro 5G असे दोन स्मार्टफोन्स आले आहेत. दोन्ही फोन्सच्या फीचर्समध्ये फरक फक्त प्रोसेसरचा आहे. OPPO F21 Pro सीरिज भारतात 64MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट, 32MP सेल्फी कॅमेरा, 8GB RAM आणि फायबर ग्लास लेदर डिजाइनसह आली आहे.  

OPPO F21 Pro सीरिजचे स्पेसिफिकेशन्स 

ओप्पोच्या या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह 600नीट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. फोन्सच्या मागे एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचाच मॅक्रो सेन्सर मिळतो. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.   

हे स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाले आहेत. परंतु यातील व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5जीबी अतिरिक्त रॅम मिळवता येतो. हे डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12.1 वर चालतात. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट 4G मॉडेलमध्ये देण्यात आला आहे. तर OPPO F21 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 695 SoC आहे.   

फोन्समध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच या ड्युअल सिम फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी मिळते. जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीनं चार्ज करता येते.   

OPPO F21 Pro सीरिजची किंमत 

OPPO F21 Pro 4G सीरीज Sunset Orange आणि Cosmic Black कलर ऑप्शनमध्ये सादर झाली आहे. तसेच OPPO F21 Pro 5G स्मार्टफोन Rainbow Spectrum आणि Cosmic Black रंगात विकत घेता येईल. OPPO F21 Pro 4G ची किंमत 22,999 रुपये आहे. 5G व्हेरिएंटसाठी 25,999 रुपये द्यावे लागतील.  

टॅग्स :oppoओप्पोtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन