शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात स्वस्त आणि दमदार 5G स्मार्टफोन OPPO नं लाँच केला; फोनमध्ये 8GB RAM ची ताकद

By सिद्धेश जाधव | Updated: April 18, 2022 15:59 IST

Oppo नं आपला सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 13MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.  

Oppo नं आपला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला आहे. कंपनीनं हा फोन आपल्या लोकप्रिय ए सीरिजमध्ये Oppo A55s 5G नावानं लाँच केला आहे. यात 8GB रॅम, 5000mAh ची दमदार बॅटरी आणि 13MP चा शानदार कॅमेरा आहे. चला जाणून घेऊया Oppo A55s 5G ची किंमत आणि फीचर्स.  

Oppo A55s चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo A55s 5G मध्ये 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा टियरड्रॉप नॉच डिस्प्ले 720 x 160 पिक्सलसह एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं यात मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 700 चिपसेटचा वापर केला आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. डिवाइस Android 11 आधारित ColorOS 11.1 वर चालतो. 

सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Oppo A55s 5G मध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर हँडसेटच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. Oppo A55s मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Oppo A55s ची किंमत  

Oppo A55s चे दोन व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. यातील 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 1,099 युआन (सुमारे 13,100 रुपये) आहे. तर फोनचा टॉप एन्ड व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह आला आहे. ज्याची किंमत 1,199 युआन (सुमारे 14,300 रुपये) आहे. हा फोन ब्रिस्क ब्लू, रिदम ब्लॅक आणि टेम्परामेंट गोल्ड रंगात विकत घेता येईल. सध्या चीनमध्ये आलेला हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.   

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल