Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Updated: March 19, 2022 11:21 IST2022-03-17T12:57:00+5:302022-03-19T11:21:36+5:30

Oppo A16e स्मार्टफोन Helio P22 प्रोसेसर, 4GB रॅम, Android 11 आणि मोठ्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो.  

Oppo A16e smartphone will be launched in India soon  | Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स 

Oppo A16e स्मार्टफोनवर तुटून पडतील ग्राहक; 10 हजारांच्या आत फाडू फीचर्स 

Oppo भारतात आपल्या A सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी एक बजेट फोन भारतीयांच्या भेटीला आणू शकते, अशी माहिती MySmartPrice नं दिली आहे. टिपस्टर मुकुल शर्मानं देखील या स्मार्टफोनची माहिती दिली आहे. ओप्पो भारतात Oppo A16e स्मार्टफोन सादर करू शकते. रिपोर्टमधून या फोनच्या व्हेरिएंट्स आणि किंमतीचा देखील खुलासा झाला आहे.  

Oppo A16e ची भारतीय किंमत 

रिपोर्टनुसार, Oppo A16e स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स भारतात येऊ शकतात. यातील बेस व्हेरिएंटमध्ये 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज मिळू शकते, तर मोठा व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला जाईल. या फोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 9,990 रुपये ठेवली जाऊ शकते. तर मोठा व्हेरिएंट 11,990 रुपयांमध्ये भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो.  

Oppo A16e चे स्पेसिफिकेशन्स  

Oppo A16e स्मार्टफोनमध्ये 6.52-इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला जाईल. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा Helio P22 प्रोसेसर दिला जाईल. सोबत ग्राफिक्ससाठी PowerVR GE8320 GPU मिळेल. ओप्पोचा स्मार्टफोन Android 11 वर चालेल. यात 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. जी डेडिकेटेड मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येईल.  

या आगामी ओप्पो स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. पावर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 4230mAh ची बॅटरी दिली जाईल.Oppo A16e स्मार्टफोन Black, Blue, आणि Silver अशा तीन रंगात सादर केला जाईल. परंतु अजूनही या फोनची अचूक लाँच डेट मात्र समोर आली नाही.  

Web Title: Oppo A16e smartphone will be launched in India soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.