शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

12GB रॅम अन् 7100mAh ची बॅटरी; OnePlus च्या या फोनवर मोठा डिस्काउंट, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 17:20 IST

OnePlus Nord CE 5: कंपनीने काही दिवसांपूर्वीच हा दमदार बॅटरीवाला फोन लॉन्च केला होता.

OnePlus ने त्यांच्या नुकत्याच लॉन्च झालेल्या Nord CE 5 ची किंमत कमी केली आहे. हा फोन महिन्याच्या सुरुवातीला OnePlus Nord 5 सोबत लॉन्च करण्यात आला होता. OnePlus कडून हा सर्वात मोठी बॅटरी असलेला फोन असून, यात तब्बल 7,100mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. या फोनची किंमत ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर कमी करण्यात आली आहे. 

किंमत कमी झालीकंपनीने OnePlus Nord CE 5 तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB ला लॉन्च केला आहे. याची सुरुवातीची किंमत 24,999 रुपये आहे. तर, इतर दोन व्हेरिएंट अनुक्रमे 26,999 आणि 28,999 रुपयांना मिळतात. पहिल्या सेलमध्ये, या फोनच्या खरेदीवर 2,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

याशिवाय, फोनच्या खरेदीवर नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफरदेखील दिल्या जात आहेत. जुन्या फोनच्या बदल्यात हा फोन 23,450 रुपयांपर्यंत बचत करू शकता. हा फोन मार्बल मिस्ट, ब्लॅक इन्फिनिटी आणि नेक्सस ब्लू या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.

Onlus Nord CE 5 चे फिचर्सया OnePlus फोनमध्ये 6.77-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. फोनचा डिस्प्ले FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तर, याला 1430 nits पर्यंतच्या पीक ब्राइटनेससाठी देखील सपोर्ट मिळेल. हा फोन MediaTek Dimensity 8350 Apex प्रोसेसरवर काम करतो. हा फोन 12GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 7,100mAh बॅटरी आणि 80W SuperVOOC वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट आहे.

OS आणि कॅमेराहा फोन अँड्रॉइड 15 वर आधारित OxygenOS 15 वर काम करतो. फोनमध्ये Google Gemini आधारित AI फीचर्स आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी, या फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड, ब्लूटूथ 5.4, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखी फीचर्स आहेत. या फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. फोनमध्ये 50 एमपीचा मुख्य आणि 8 एमपीचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 एमपीचा कॅमेरा मिळेल.

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान