फक्त 15 मिनिटांत दिवसभराचं चार्जिंग; 8GB रॅम असलेल्या नवीन OnePlus फोनची किंमत परवडणारी 

By सिद्धेश जाधव | Published: May 6, 2022 01:20 PM2022-05-06T13:20:46+5:302022-05-06T13:22:12+5:30

OnePlus Nord 2T स्मार्टफोन कोणताही गाजावाजा न करता कंपनीनं युरोपात सादर केला आहे. यात 8GB रॅम आणि 80W फास्ट चार्जिंग मिळते.  

OnePlus Nord 2T Silently Launched With 8GB RAM And 80W Fast Charging   | फक्त 15 मिनिटांत दिवसभराचं चार्जिंग; 8GB रॅम असलेल्या नवीन OnePlus फोनची किंमत परवडणारी 

फक्त 15 मिनिटांत दिवसभराचं चार्जिंग; 8GB रॅम असलेल्या नवीन OnePlus फोनची किंमत परवडणारी 

Next

OnePlus नं काही दिवसांपूर्वी भारतात OnePlus 10R स्मार्टफोन सादर केला आहे. हा डिवाइस 150W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. याची किंमत फ्लॅगशिप रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे. परंतु युरोपमध्ये मिड रेंजमध्ये OnePlus Nord 2T स्मार्टफोन गुपचूप लाँच करण्यात आला आहे. यात 8GB RAM, 80W फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे.  

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स 

OnePlus Nord 2T स्मार्टफोन नॉर्ड सीरिजमधील सर्वात प्रीमियम डिवाइस आहे. त्यामुळे यात अनेक स्पेक्स अपग्रेड करण्यात आले आहेत. हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह येतो. जो पंच होल डिजाईनसह 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित ऑक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा डिमेन्सिटी 1300 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 8GB रॅम आणि 128GB मेमरी मिळते.  

फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP Sony IMX766 सेन्सर मुख्य कॅमेरा म्हणून मिळतो. हा सेन्सर OIS ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा मोनोक्रोम सेन्सर आहे. फ्रंटला 32MP चा सेल्फी शुटर आहे. OnePlus Nord 2T मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे फक्त 15 मिनिटांत दिवसभराचा बॅटरी बॅकअप मिळतो, असा दावा कंपनीनं केला आहे.  

OnePlus Nord 2T ची किंमत आणि उपलब्धता  

OnePlus Nord 2T चा एकच व्हेरिएंट युरोपमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यात 8GB रॅम आणि 128GB ची मेमरी मिळते. युरोपात हा हँडसेट 399 यूरो (सुमारे 32,000 रुपये) देऊन विकत घेता येईल. कंपनीनं - ब्लॅक आणि ग्रीन हे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. हा फोन लवकरच भारतात देखील उपलब्ध होऊ शकतो.  

Web Title: OnePlus Nord 2T Silently Launched With 8GB RAM And 80W Fast Charging  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.