शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

वनप्लसचा धमाका! 20000 हून कमी किंमतीत स्मार्टफोन लाँच; दुसरा 5G तंत्रज्ञानाचा

By हेमंत बावकर | Updated: October 26, 2020 19:45 IST

OnePlus Nord N100 Launch : वनप्लसने आज अमेरिका आणि युरोपच्या बाजारात खळबळ उडविली आहे. स्वस्त किंमतीतील दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

प्रीमियम स्मार्टफोन बनविणारी चीनची कंपनी वनप्लस सर्वात स्वस्त OnePlus Nord N100 लाँच करून खळबळ उडवून दिली आहे. याचबरोबर कंपनीने स्वस्त किंमतीत oneplus Nord N10 5G लाँच केला आहे. वनप्लसच्या या नव्या फोनची किंमत 233 डॉलर म्हणजेच 17,230 रुपये आणि वनप्लस नॉर्ड एन10 5जी 429 डॉलर म्हणजेच 31,740 रुपये ठेवण्यात आली आहे. 

वनप्लस नॉर्ड एन100 हा एन्ट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. तर नॉर्ड एन10 5जी स्वस्त ५जी फोन आहे. याआधी कंपनीने दोन महिन्यांपूर्वी वनप्लस नॉर्ड भारतात लाँच केला होता. तो ५जी सपोर्ट करतो. याची किंमत 25 ते 29 हजाराच्या रेंजमध्ये आहे. सध्या हे दोन्ही फोन अमेरिकेच्या बाजारात लाँच झाले असून भारतातही लवकरच लाँच होणार आहेत. तसेच विक्रीही सुरु केली जाणार आहे. भारतीय बाजारपेठही या कंपनीसाठी महत्वाची असल्याने इथेही या किंमतींमध्ये फारसा बदल होण्याची शक्यता नाही. 

OnePlus 8T लाँच; Apple च्या नव्या आयफोनना देणार टक्कर, जाणून घ्या किंमत

OnePlus Nord N10 5G OnePlus Nord N10 5G मध्ये 6.49 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. Snapdragon 690 प्रोसेसर देण्यात आला असून हा ५ जी तंत्रज्ञनाने युक्त आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी दिली आहे. 30 Wफास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला असून 8MP, 2MP आणि 2MP डेप्थ सेंसरचे 4 कॅमेरे लावण्यात आले आहेत. तर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. OxygenOS 10.5 ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये देण्यात आली आहे. 

 अखेर स्वस्तातला OnePlus Nord 5G लाँच; जाणून घ्या भारतातील किंमत

OnePlus Nord N100 वनप्लसच्या या एन्ट्रीलेव्हल फोनमध्ये 6.52" HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये Snapdragon 460 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. 4GB RAM आणि 64GB व्हेरिअंट लाँच केले आहे. या फोनमध्ये 13MP+2MP+2MP ट्रिपल रियर कैमरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलAmericaअमेरिका