शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

OnePlus पुन्हा देऊ शकते स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव; लाँचपूर्वीच OnePlus 9RT ची किंमत झाली लीक  

By सिद्धेश जाधव | Updated: January 13, 2022 12:17 IST

OnePlus 9RT Price In India: OnePlus 9RT च्या लाँचपूर्वीच या फोनच्या भारतीय किंमतीची माहिती लीक झाली आहे. लीक किंमत पाहता कंपनी पुन्हा एकदा कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देऊन चाहत्यांना खुश करणार असल्याचं दिसत आहे.

OnePlus 9RT भारतात 14 जानेवारीला लाँच होणार आहे. आता या लाँचला फक्त एक दिवस शिल्लक असतानाच या स्मार्टफोनची किंमत लीक झाली आहे. टिपस्टर योगेश बरारनं या स्मार्टफोनच्या भारतीय किंमतीची, कलर व्हेरिएंट्स आणि सेल डेटची देखील माहिती दिली आहे. हे लिक्स खरे ठरले तर जुनी वनप्लस पुन्हा बघायला मिळेल. हा फोन कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देऊ शकतो.  

OnePlus 9RT Price In India (लीक किंमत) 

टिपस्टरनुसार OnePlus 9RT स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स देशात येतील. यातील 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 42,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 46,999 रुपये ठेवली जाऊ शकते. कंपनी OnePlus 9RT स्मार्टफोन ब्लॅक आणि सिल्वर कलर व्हेरिएंट्समध्ये 17 जानेवारीअसून अ‍ॅमेझॉनवर Great Republic Day सेलमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करेल.  

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स     

या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे हा फोन OxygenOS ऐवजी अँड्रॉइड 11 आधारित Oppo च्या ColorOS वर चालतो. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. 

OnePlus 9RT मध्ये 6.62 इंचाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे.  

हे देखील वाचा:

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान