OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट  

By सिद्धेश जाधव | Published: January 12, 2022 05:06 PM2022-01-12T17:06:43+5:302022-01-12T17:17:35+5:30

OnePlus 9R भारतात स्टॉक शिल्लक असेपर्यंतच विकत घेता येईल, गेल्यावर्षी आलेला हा फोन त्यानंतर देशात दिसणार नाही. हा निर्णय घेण्यामागे दोन कारणं असल्याचं समोर आलं आहे.

Oneplus 9r to discontinue in india confirms by oneplus but know how you can buy  | OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट  

OnePlus लवर्सना जोरदार झटका! कंपनीनं बंद केला लोकप्रिय स्मार्टफोन; उरले फक्त काही हँडसेट  

googlenewsNext

OnePlus लवकरच भारतात नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 9RT सादर करणार आहे. हा फोन याच आठवड्यात देशात सादर केला जाऊ शकतो. तसेच शक्तिशाली OnePlus 10 Pro देखील जागतिक बाजारात उतरला आहे. या आगामी स्मार्टफोन्सना जागा करण्यासाठी कंपनी जुने फोन्स बाजारातून हटवत आहे. यात मिड रेंज OnePlus 9R चा देखील समावेश आहे.  

वनप्लस 9R स्टॉक संपेपर्यंत देशात मिळेल, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांच्या हवाल्याने Livemint नं दिली आहे. सध्या उपलब्ध असलेला स्टॉक संपल्यावर हा फोन भारतात विकत घेता येणार नाही. 14 जानेवारीला येणाऱ्या नव्या OnePlus 9RT ची किंमत देखील OnePlus 9R च्या रेंजमध्ये असल्यामुळे कंपनी हा निर्णय घेत असावी. साध्य हा फोन डिस्कॉउंसह Amazon वर उपलब्ध आहे.  

आगामी OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स    

OnePlus 9RT मध्ये 6.62-चाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे हा फोन OxygenOS ऐवजी अँड्रॉइड 11 आधारित Oppo च्या ColorOS वर चालतो.      

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

वनप्लसचे फोन फुटत असतानाच नवा 'धमाका'; OnePlus 10 Pro लॉन्च, अफलातून फिचर्स

Laptop Under 25000: खूप कमी किंमतीत धमाकेदार फीचर्स असलेले HP आणि Lenovo चे लॅपटॉप; विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट

Web Title: Oneplus 9r to discontinue in india confirms by oneplus but know how you can buy 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.