शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

OnePlus फॅन्ससाठी बॅड न्यूज! भारतातील 3 मॉडेल्स होणार बंद, यावर्षी लाँच झालेल्या वनप्लसचाही समावेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:28 IST

OnePlus भारतात लवकरच आपल्या काही स्मार्टफोन मॉडेल्सची विक्री बंद करणार आहे. यासाठी कंपनीनं जुन्या मॉडेल्सवर डिस्काउंट देखील देण्यास सुरुवात केली आहे.  

OnePlus भारतीय बाजारात लवकरच OnePlus 9RT लाँच करणार आहे. तसेच कंपनीची OnePlus 10 सीरिज देखील पुढील महिन्यात जागतिक बाजारात उतरणार आहे. या नव्या सीरिजमधील स्मार्टफोन्ससाठी जागा करण्यासाठी कंपनी आपले काही जुने मॉडेल्स बंद करू शकते. विशेष म्हणजे यात वर्षीच आलेल्या OnePlus 9 Series चा देखील समावेश आहे.  

बंद होणारे OnePlus फोन्स  

टिपस्टर Yogesh Brar नुसार, OnePlus 9RT भारतीय बाजारात दाखल होताच OnePlus 9, OnePlus 9R आणि OnePlus 8T एक्झिट घेतील. अर्थात वनप्लसचा नवीन फोन आल्यानंतर कंपनीचे हे सर्व हँडसेट भारतीय बाजारात खरेदी करता येणार नाहीत. या जुन्या स्मार्टफोन्सवर कंपनी सध्या खूप डिस्काउंट देत आहे, त्यामुळे योगेशच्या बातमी खरी ठरू शकते.  

कंपनी OnePlus 9 आणि OnePlus 9R वर तगडा डिस्काउंट देत आहे. OnePlus 8T देखील कमी किंमतीत उपलब्ध झाला आहे. परंतु अजूनही OnePlus 9RT भारतात कधी लाँच केला जाईल, याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.  

OnePlus 9RT चे स्पेसिफिकेशन्स   

OnePlus 9RT मध्ये 6.62-चाचा फुल एचडी+ E4 अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन, 1300 निट्स पीक ब्राईटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1300Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये कंपनीने क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. त्याचबरोबर 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. विशेष म्हणजे हा फोन OxygenOS ऐवजी अँड्रॉइड 11 आधारित Oppo च्या ColorOS वर चालतो.     

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रावाईड अँगल सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा Sony IMX471 सेल्फी शुटर देण्यात आला आहे. OnePlus 9RT मधील 4,500mAh ची ड्युअल-सेल बॅटरी 65W Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर

सुपरफास्ट चार्जिंग, मोठी बॅटरी; आतापर्यंतचा सर्वात दमदार फोन असेल आगामी वनप्लस

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान