जुन्या कॅमेऱ्यासह येणार OnePlus 10RT; लाँच पूर्वीच माहितीचा खुलासा  

By सिद्धेश जाधव | Published: June 29, 2022 12:54 PM2022-06-29T12:54:04+5:302022-06-29T12:54:08+5:30

OnePlus 10RT स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा होण्यास सुरुवात झाली आहे.

Oneplus 10rt may feature old 50mp sony imx766 sensor leak suggest  | जुन्या कॅमेऱ्यासह येणार OnePlus 10RT; लाँच पूर्वीच माहितीचा खुलासा  

जुन्या कॅमेऱ्यासह येणार OnePlus 10RT; लाँच पूर्वीच माहितीचा खुलासा  

Next

OnePlus चे चाहते सध्या कंपनीबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. एकेकाळी दर्जेदार स्मार्टफोन्स सादर करणारा ब्रँड आता अन्य स्मार्टफोन कंपन्यांप्रमाणे वागू लागला आहे. आताच बातमी आली आहे की आगामी OnePlus 10RT स्मार्टफोनमध्ये जुना कॅमेरा सेन्सर देण्यात येणार आहे. त्यामुळे चाहत्यांनी देखील सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे.  

टिप्सटर योगेश ब्रारनुसार OnePlus 10RT स्मार्टफोनमध्ये 50MP IMX766 कॅमेरा सेन्सर ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशनसह देण्यात येईल. या सेन्सरचा वापर प्रायमरी कॅमेरा म्हणून OnePlus 10R मध्ये करण्यात आला होता. तर OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये देखील हाच मुख्य कमर होता. तसेच OnePlus 9 मध्ये या सेन्सरचा वापर अल्ट्रावाईड अँगल लेन्सप्रमाणे करण्यात आला होता.  

OnePlus 10RT चे लीक स्पेसिफिकेशन्स 

लिक्सनुसार, OnePlus 10RT स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यातील प्रायमरी कॅमेरा 50MP चा Sony IMX766 सेन्सर आहे. जो f/1.88 अ‍ॅपर्चर, 84.4 डिग्री व्यू अँगल आणि OIS ला सपोर्ट करेल. सोबत 119.7 डिग्री व्यू अँगल आणि अ‍ॅपर्चर f/2.25 असलेली 8MP अल्ट्रावाईड अँगल लेन्स असेल. 2MP ची मॅक्रो लेन्स f/2.4 अ‍ॅपर्चरसह थर्ड कॅमेरा म्हणून देण्यात येईल. OnePlus 10RT मध्ये 16MP चा Samsung S5K3P9 सेन्सर, f/2.45 अ‍ॅपर्चर, 82.3 डिग्री व्यू अँगल आणि EIS सपोर्टसह फ्रंट कॅमेऱ्याची भूमिका बजावेल.  

याव्यतिरिक्त OnePlus 10RT स्मार्टफोनच्या अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली नाही. परंतु हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. तसेच जुन्या शेड्यूलनुसार याची एंट्री ऑक्टोबर 2022 मध्ये होऊ शकते.  

Web Title: Oneplus 10rt may feature old 50mp sony imx766 sensor leak suggest 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.