शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

17 मिनिटांत फुल चार्ज होणाऱ्या OnePlus फोनवर मोठी सूट; जगातील सर्वात फास्ट चार्जिंग स्वस्तात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2022 15:19 IST

OnePlus 10R 5G स्मार्टफोनवर पहिल्यांदाच मोठा डिस्काउंट दिला जात आहे, त्यामुळे 150W फास्ट चार्जिंग असलेला डिवाइस स्वस्तात मिळत आहे.  

OnePlus नं जगातील सर्वात वेगवान फास्ट चार्जिंग स्पीड असलेला स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी भारतात सादर केला होता. कंपनीच्या दाव्यानुसार 17 मिनिटांत OnePlus 10R 5G फुल चार्ज होतो. आता हा शानदार स्मार्टफोन पहिल्यांदाच Mediatek Dimensity 8100 Max चिपसेट, 50MP कॅमेरा आणि 150W फास्ट चार्जिंग असलेला स्मार्टफोन डिस्काउंटसह विकला जात आहे.  

OnePlus 10R 5G वरील सूट 

OnePlus 10R 5G स्मार्टफोन OnePlus Store वर सध्या 38,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. परंतु वनप्लस कम्युनिटी सेलमध्ये तुम्ही हा फोन 5000 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह विकत घेऊ शकता. तसेच आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड, EMI वर 4000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. अ‍ॅमेझॉनवर देखील जुन्या फोनच्या एक्सचेंजनंतर 13,050 रुपयांची सूट मिळेल.  

OnePlus 10R चे स्पेसिफिकेशन्स 

प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक डिमेनसिटी 8100 मॅक्स चिपसेटचा वापर केला आहे. एआयनाही मीडियाटेक एपीयू 580 आणि ग्राफिक्ससाठी माली-जी610 जीपीयू आहे. हा अँड्रॉइड 12 बेस्ड आक्सिजन ओएस 12.1 वर चालतो. चांगल्या परफॉर्मन्ससाठी 3D Passive Cooling System आणि HyperBoost Gaming Engine असे फीचर्स देखील आहेत. 

फोटोग्राफीसाठी वनप्लस 10आर स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स तसेच 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. 

वनप्लस 10आर स्मार्टफोन 6.7 इंचाचा फ्लुइड अ‍ॅमोलेड डिस्प्लेहं बाजारात आला आहे. ज्यात 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 720हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 1000हर्ट्ज रिस्पांस रेट मिळतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेला हा डिवाइस कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. तसेच 394पीपीआय, 10बिट कलर एचडीआर10+ इत्यादी फीचर्स देखील आहेत.  

वनप्लस 10आर च्या एका मॉडेलमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह 5,000एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. जी 32 मिनिटांत फुल चार्ज होते. तर 150W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500एमएएच बॅटरी असलेला आणखी एक मॉडेल सादर करण्यात आला आहे. जो फक्त 5 मिनिटांत 50 टक्के तर 17 मिनिटांत फुलचार्ज होऊ शकतो.   

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान