OnePlus 10 Pro मध्ये मिळणार जबरदस्त झूम कॅमेरा फिचर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: November 23, 2021 11:59 AM2021-11-23T11:59:43+5:302021-11-23T12:02:10+5:30

Oneplus 10 Pro: OnePlus च्या आगामी फ्लॅगशिप सीरीजची माहिती येण्यास सुरुवात झाली आहे. आता OnePlus 10 Pro मधील कॅमेरा फिचरची माहिती मिळाली आहे.  

Oneplus 10 pro 5g may come with oneplus 9 pro like camera zoom capabilities   | OnePlus 10 Pro मध्ये मिळणार जबरदस्त झूम कॅमेरा फिचर; स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह होणार लाँच 

(सौजन्य: onleaks आणि zoutonus)

Next

OnePlus सध्या आगामी फ्लॅगशिप सीरीजवर काम करत आहे. या सीरिजमधील OnePlus 10 Pro चे रेंडर्स देखील गेल्या आठवड्यात लीक झाले होते. या फोनचा बॅक पॅनल Samsung Galaxy S21 Ultra सारखा दिसत आहे. तसेच यात Qualcomm चा आगामी प्रोसेसर Snapdragon 8 Gen 1 अर्थात Snapdragon 898 SoC देण्यात येईल, असे देखील समजले आहे. आता या प्रो मॉडेलमधील कॅमेरा फिचरची माहिती मिळाली आहे.  

चीनी टिप्स्टर Digital Chat Station ने आगामी वनप्लसच्या कॅमेरा फीचर्सची माहिती दिली आहे. त्यानुसार OnePlus 10 Pro मध्ये OnePlus 9 Pro सारखाच झूम फीचर मिळेल. 9 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात 8MP ची एक टेलीफोटो लेन्स आहे. ही लेन्स 3.3x ऑप्टिकल झूम आणि 30x डिजिटल झूमला सपोर्ट करते. या फिचरसाठी वनप्लसने Hasselblad सोबत भागेदारी केली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार नव्या प्रो व्हर्जनमध्ये देखील हे फिचर तसेच राहणार आहे.  

OnePlus 10 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

OnePlus 10 Pro मध्ये 6.7-इंचाचा 1440p रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल, त्यामुळे फोनचा डिस्प्ले स्मूद ऑपरेट होईल. प्रोसेसिंगसाठी आगामी वनप्लसमध्ये Qualcomm Snapdragon 898 चिपसेट मिळेल. तसेच फोनमधील 5000mAh ची बॅटरी आणि कंपनीच्या Warp Charge टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. त्याचबरोबर 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. OnePlus 10 Pro मध्ये Android 12 आधारित ColorOS किंवा OxygenOS मिळू शकतो.   

Web Title: Oneplus 10 pro 5g may come with oneplus 9 pro like camera zoom capabilities  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.