शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

फ्लॅगशिप प्रोसेसरसह लाँच होणार OnePlus 10; कंपनीचे CEO Pete Lau यांनी केला खुलासा, पाहा फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 17:07 IST

OnePlus 9 नंतर आता कंपनी याच लाइनअपमध्ये OnePlus 10 सीरिजवर काम करत आहे. कंपनीनं आपल्या फ्लॅगशिप फोनबद्दल दिली माहिती. 

OnePlus 10 Series Launch: फीचर्स आणि चांगल्या स्पेसिफिकेशनसाठी OnePlus हा ब्रँड ओळखला जातो. स्मार्टफोन सेगमेंटमध्ये OnePlus ही कंपनी अन्य स्पर्धक कंपन्यांना स्पर्धा देत आहेत. या कंपनीचे फोन कायमच आपल्या अपकमिंग सीरिज आणि लाँच बाबत चर्चेचे विषय ठरत असतात. OnePlus 9 सीरिजनंतर कंपनी आता OnePlus 10 सीरिजवर काम करत आहे. यासंदर्भात कंपनीचे सीईओ Pete Leu यांनी खुलासा केला आहे. OnePlus 10 सीरिज लेटेस्च क्वॉलकॉम फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणार असल्याचा दावा Pete leu यांनी केला आहे. यासोबतच नव्या नव्या सीरिजबाबत अनेक चर्चा वर्तवल्या जात आहेत. यावरून ही नवी सीरिज लवकरच बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सीरिज 2022 मध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अधिकृतपणे लाँच केली जाईल. हा स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च केला जाईल. तर मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लाँच केला जाऊ शकतो.काय असेल खास?इंटनेटवर वनप्लसच्या आगामी स्मार्टफोच्या स्पेसिफिकेशनबाबत चर्चा सुरू आहे. हे फोन स्नॅपड्रॅगन 8 GEN 1 चिपसेटसोबत येतात. हा क्वॉलकॉम मोबाइलसाठी नुकताच लाँच करण्यात आलेला फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. वन प्लसचे सीईओ पीट लाउ यांनी आता या वृत्ताला दुजोरा दिलाय.नवा चिपसेट कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन न्यू प्रोडक्ट्समध्ये सामील करण्यात आल्याचे फोनएरेनाद्वारे पाहण्यात आलेल्या एका वीबो पोस्टमध्ये म्हटलं आहे. चिपसेटच्या लाँचदरम्यानच कंपनीनं आपल्या नव्या डिव्हाईसवर या चिपसेटचा वाप करणार असल्याचं म्हटलं होतं. काय असतील संभाव्य स्पेसिफिकेशन?लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus 10 Pro वर 125W फास्ट चार्जिंग मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय त्यात 5000mAh बॅटरी असू शकते. डिस्प्लेबाबत सांगायचं झालं तर यात 6.7-इंचाचा QHD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अनेक रेंडर्सनी आगामी OnePlus फ्लॅगशिप वर एक नवं कॅमेरा सेटअप दाखवलं आहे. फोनमध्ये रियर कॅमेरा मॉड्यूल, एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअपही दिलं जाऊ शकतं. याशिवाय समोर एक पंच-होल सेल्फी शूटर असू शकतो. OnePlus 10 Pro ब्लॅक, व्हाईट आणि ग्रे कलर पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोन