शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

OnePlus 10 च्या जबरदस्त डिजाइनचा खुलासा; नवीन Nord फोन देखील लवकरच येणार बाजारात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 17:39 IST

Oneplus 10 Design Leak: OnePlus 10 Pro स्मार्टफोन कर्व एज आणि पंच होल कटआउटसह येईल आणि तर रेगुलर व्हर्जन फ्लॅट स्क्रीनसह सादर केला जाईल.

ठळक मुद्देOnePlus 10 सीरिज 2022 मध्ये मार्च आणि एप्रिल मध्ये लाँच होऊ शकते.OnePlus 10 ची डिजाइन OnePlus 9 सारखीच असेल.

Oneplus अशी कंपनी आहे जी वर्षातून नेमकेच स्मार्टफोन मॉडेल बाजारात सादर करते. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या मिडरेंज नॉर्ड सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर केला होता. तर आता OnePlus 9 RT स्मार्टफोनची तयारी सुरु आहे, जो पुढील महिन्यात भारत आणि चीनमध्ये लाँच होऊ शकतो. हा देखील मिडरेंज सेगमेंटमध्ये सादर होणारा फोन आहे, अशी चर्चा आहे. परंतु त्याहीपेक्षा OnePlus चाहते पुढील वर्षीच्या फ्लॅगशिप OnePlus 10 सीरीजची जास्त वाट बघत आहेत.  

OnePlus 10 सीरिज 2022 मध्ये मार्च आणि एप्रिल मध्ये लाँच होऊ शकते. परंतु ही एक फ्लॅगशिप सीरिज आहे जी OnePlus 9 सीरीजची जागा घेईल. आता टिपस्टर योगेश बरारने या सीरिजच्या डिजाईनची माहिती दिली आहे. त्याने दावा केला आहे कि OnePlus 10 ची डिजाइन OnePlus 9 सारखीच असेल. आगामी OnePlus 10 Pro स्मार्टफोन कर्व एज आणि पंच होल कटआउटसह येईल आणि तर रेगुलर व्हर्जन फ्लॅट स्क्रीनसह सादर केला जाईल. तसेच कंपनी Nord सीरिजच्या नवीन फोन आणि अ‍ॅक्सेसरीजवर देखील काम करत आहे, जे ऑक्टोबर मध्ये होऊ शकतात.  

आगामी OnePlus 9 RT चे लीक स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 9 RT मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. हा फोन OxygenOS 12 सह लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असेल. रिपोर्टनुसार या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870प्लस चिपसेट मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी या वनप्लस फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात येईल. वनप्लस 9 आरटी मधील 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोन